घरपालघर250 रूपये घ्या, तंदुरूस्त राहा

250 रूपये घ्या, तंदुरूस्त राहा

Subscribe

जवळपास ७० टक्के हून अधिक अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहन भत्ता मिळत असल्याची माहिती आयुक्तलयामार्फत देण्यात आली आहे. परंतु,या भत्त्यात वाढ होण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

भाईंदर :- पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस खात्यात कर्तव्य बजावत तीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रोत्साहन भत्ता म्हणून दरमहा प्रत्येकी २५० रुपये भत्ता दिला जातो. राज्य सरकार 2005 पासून पोलिसांना शारीरिक तंदुरुस्तीसाठी प्रोत्साहन भत्ता देत आहे. त्यावेळा पासून दर महिन्याला २५० मिळत भत्ता मिळत होता. दरमहा मिळणारा भत्ता पोलीस आपल्या सकस आहारावर खर्च करत होते. 18 वर्षांपासून पोलिसांना २५० रुपये भत्ता मिळत असून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. मीरा- भाईंदर व वसई- विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात देखील जवळपास ७० टक्के हून अधिक अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहन भत्ता मिळत असल्याची माहिती आयुक्तलयामार्फत देण्यात आली आहे. परंतु,या भत्त्यात वाढ होण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

पोलीस कर्मचार्‍यांनी दिलेली माहिती व अर्ज यांची पडताळणी करण्यासाठी विशेष समिती असते. भत्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांना डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. आयुक्तांकडून अर्ज घेतल्यानंतर त्यात दिलेली सर्व माहिती अचूक भरायची असते. त्यामध्ये बॉडी मास इंडेक्सनुसार परिणाम असायला पाहिजे. त्याचप्रमाणे वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे लागते. त्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांकडून अर्जाची पडताळणी केल्यानंतर अडीचशे रुपये वेतनात लागू करण्यात येतात. लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. भत्ताच नव्हे तर सर्व सोयी पोलिसांना चांगल्या दिल्या गेल्या पाहिजेत व पोलीस शारीरिक रित्या तंदुरुस्त असतील तर लोकांची सुरक्षा करू शकतील.पोलिसांना तंदुरुस्ती भत्ता म्हणजेच फिटनेस अलाउन्सेस दिले जातात. मात्र 1८ वर्षानंतरही पोलिसांच्या तंदुरुस्ती भत्यात वाढ झालेली नाही. ती फक्त अडीचशे रुपये इतकीच आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत इतक्या कमी भत्त्यात पोलीस कसे फिट राहावे असे पोलिसांचे खाजगीत बोलणे आहे. त्याकरिता प्रोत्साहन भत्ता वाढवावा जेणेकरुन महागाईच्या काळात पोलिसांना फायदा होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -