घरपालघरप्रदुषित सांडपाणी सोडणार्‍या कारखान्यांवर कारवाई करा

प्रदुषित सांडपाणी सोडणार्‍या कारखान्यांवर कारवाई करा

Subscribe

त्यामुळे गावकर्‍यांमध्ये प्रचंड घबराट पसरून प्रदुषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता.

वसईः तारापूर-बोईसर औद्योगिक वसाहतीतील प्रदूषित सांडपाण्यामुळे नवापूर दांडी खाडी व सातपाटी मुरबे खाडी प्रदूषित होत आहे. त्यावर जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यानुसार उचित कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते केदार काळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यातील दूषित रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करता नवापूर – दांडी आणि सातपाटी – मुरबे खाडीत सोडले जाते. या प्रदूषित पाण्यामुळे खाडी परिसरातील जैव विविधता, मत्स्य संपदेचा र्‍हास होऊन येथील नागरिकांच्या आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. प्रदुषणाचा परिणाम मच्छीमारांच्या उपजिविकेवर परिणाम झाला आहे, अशी तक्रार काळे यांनी केली आहे. नवापूर गावच्या समुद्रात प्रक्रिया न केलेले सांडपाणी मोठ्या प्रमाणावर सोडण्यात येत असल्याचे तटरक्षक दलाच्या जवानांना हेलिकॉप्टरने गस्त घालताना दिसून आली होती. त्याचे छायाचित्रण त्यावेळी जवानांनी केले होते. त्यामुळे गावकर्‍यांमध्ये प्रचंड घबराट पसरून प्रदुषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता.

कायद्यातील सुधारणेनुसार कारवाई करावी

- Advertisement -

प्रदूषित सांडपाणी नावपूर – दांडी आणि सातपाटी – मुराबे खाडीत सोडण्यात येत असते. याची तक्रार
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सातत्याने मच्छीमार, मच्छिमार संघटना व सोसायट्या करत असतात. पण, त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. म्हणूनच तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्रदूषित सांडपाण्यामुळे खाडी परिसरातील जैव विविधतेचा र्‍हास, मच्छिमारांची उपजीविका आणि आरोग्याची समस्या लक्षात घेता जल प्रदूषण व प्रतिबंधक कायदा’ १९७४,पर्यावरण संरक्षण कायदा १९८८ आणि २००३ यामध्ये झालेल्या महत्वाच्या सुधारणेनुसार उचित कारवाई करावी, अशी काळे यांची मागणी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -