पालघरः पालघऱ शहरात रात्री बाहेगावाहून येणाऱ्या प्रवाशांची अडवणूक करत रेल्वे स्टेशन परिसरात असलेले रिक्शाचालक तिप्पट भाडे वसुल करत असल्याची तक्रार युवा सेनेचे पालघर शहर अध्यक्ष नैवेद्य संखे यांनी केली आहे. अशा रिक्शाचालकांवर कारवाईचीही मागणी त्यांनी केली आहे. पालघर शहरात रात्रीच्यावेळी बाहेरगावावरुन येणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे स्टेशनवर असलेले रिक्षा चालक दुप्पट तिप्पत भाडे आकारात असून, त्यृमुळे सामान्य प्रवासी रात्रीचा प्रवास करणे टाळत आहेत. अत्यावशक असल्यास स्थानिक प्रवासी प्रवास करतात.
त्यांनाही रात्री असलेले रिक्षा चालक त्रास देतात. प्रवाशांनी भाडे नाकारल्यास त्यांना खडे बोल सुनावतात, तसेच काही रिक्षाचालक हे मद्यपान करून असतात, अशा तक्रारी युवासेनेचे शहर अध्यक्ष नैवेद्य संखे यांनी केली आहे. याप्रकरणी संखे यांनी जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी आसिफ बेग यांची भेट घेऊन अशा रिक्शाचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली.
रात्रीच्यावेळी प्रवाशांची अडवणूक करत असलेल्या रिक्षा चालकांवर कडक कारवाई केली जाईल.
—आसिफ बेग, प्रभारी, जिल्हा वाहतूक शाखा, पालघर