घरपालघरअंधाराचा फायदा घेऊन रासायनिक घनकचरा खुलेआम उघड्यावर

अंधाराचा फायदा घेऊन रासायनिक घनकचरा खुलेआम उघड्यावर

Subscribe

याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बोईसर पोलीस ठाणे यांना वारंवार तक्रारी करून देखील संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.

बोईसर:  बोईसर- तारापूर औद्योगिक वसाहतीच्या सरावलीतील अमृत रेसिडेन्सी परिसरात रात्रीच्या सुमारास कारखान्यांमधून निघणारा रासायनिक घनकचरा अंधाराचा फायदा घेऊन खुलेआम उघड्यावर टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्लास्टिक ड्रम आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल माफियांकडून घातक रासायनिक घनकचरा आणून टाकला जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील अनेक महिन्यांपासून या परिसरात हा घातक रासायनिक घनकचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधीमध्ये प्रचंड वाढ झाली झाली आहे. तसेच कुपनलिकांमधून येणार्‍या पाण्यालाही केमिकलचा दुर्गंध येत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बोईसर पोलीस ठाणे यांना वारंवार तक्रारी करून देखील संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.

याबाबत सरावली ग्रामपंचायतीने भ्रमनध्वनीद्वारे प्रदूषण नियंत्रण मंडळास कळवले असता जागेची पाहणी करून तसा अहवाल तयार करण्यात येणार आहे. बोईसर शहर, तारापूर औद्योगिक वसाहत आणि लगतच्या बोईसर, सरावली, खैरापाडा, बेटेगाव, कोलवडे, कुंभवली, सालवड आणि पास्थळ पाम या ८ ग्रामपंचायत क्षेत्रातील दैनंदिन कचर्‍याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच बिकट बनत चालला आहे. रोजचा जमा होणारा जवळपास २० ते २५ टन ओला आणि सुका कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायत विभागाकडे आवश्यक सफाई कर्मचारी उपलब्ध नसल्याने अनेक दिवस हा कचरा सरावली येथील तात्पुरत्या कचरा भूमीवर त्याचप्रमाणे ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांवर, रस्त्यांच्या कडेला आणि खैरापाडा मैदानात उघड्यावर टाकण्यात येत आहे. उघड्यावर टाकण्यात येत असलेला हा कचरा कुजून परिसरात प्रचंड दुर्गंधी आणि रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया

नागरिकांच्या जीवाशी हा चाललेला खेळ आहे. कारखानदार आणि अधिकारी यांच्या संगनमत हा प्रकार सुरू आहे. यास प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार आहे. आरोपींवर कारवाई होणे आवश्यक आहे. नाहीतर लोकच कायदा हाती घेतील.
– कुंदन संखे – पालघर जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -