घरपालघर'पोटाला अन्न नको, पण पाणी द्या'; आदिवासी पाड्यात टँकरमुक्त पाणीपुरवठ्याची मागणी

‘पोटाला अन्न नको, पण पाणी द्या’; आदिवासी पाड्यात टँकरमुक्त पाणीपुरवठ्याची मागणी

Subscribe

नियोजनाचा अभाव, अपयशी ठरलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजना आणि प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे टॅकरमुक्त गाव पाडे यासाठी सुरू असलेले तोकडे प्रयत्न यामुळे टँकरमुक्त गावांची संख्या कमी होण्याऐवजी दरवर्षी वाढत चालली आहे.

नियोजनाचा अभाव, अपयशी ठरलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजना आणि प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे टॅकरमुक्त गाव पाडे यासाठी सुरू असलेले तोकडे प्रयत्न यामुळे टँकरमुक्त गावांची संख्या कमी होण्याऐवजी दरवर्षी वाढत चालली आहे. कोसो मैल दुरवरच्या अंतरावरुन ग्रामीण भागातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने ‘हाताला काम नको, खायला अन्न नको, पण प्यायला पाणी द्या’, अशी म्हणायची वेळ गोरगरिब आदिवासी जनतेवर आली आहे. मोखाडा तालुक्यातील आदिवासी गाव-पाड्यांना टँकरमुक्त पाणीपुरवठा व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून तोकडे प्रयत्न चालू असुन पिण्याच्या पाण्यासाठी दरसाल लाखो रुपयांचा चुराडा होत असतो. मात्र तरीही आदिवासी नागरिकांची घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबलेली नाही.

मोखाडा तालुक्यांतील २३ टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना सद्यस्थितीत नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असताना दिवसा आड टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडे येवून पडत आहेत. यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला दरवर्षी उद्भवणाऱ्या परिस्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यांचे शहाणपण मात्र कोणालाच सुचत नसल्याने गाव-पाडावासियांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

गाव-पाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपासून टंचाईग्रस्त गाव-पाडे २५ ते ३० किलोमीटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे. तर टंचाईग्रस्त नागरिकांना हातातली मजुरीची कामे सोडून देऊन घोटभर पाण्यांसाठी वणवण भटकंती करावी लागते, हेही तितकेच खरे आहे. ज्याप्रमाणे पावसाळा सुरु होण्यासाठी चातक पक्षी आतुरतेने वाट बघत असतो, अशीच काहीशी अवस्था टँकर चालू असलेल्या गाव-पाड्यांतील जनतेची झालेली आहे. यामुळे मोलमजुरी करुन पोटाची खळगी भरणाऱ्या आदिवासी बांधवाची पाणी टंचाईमुळे मोठी अडचण झाली आहे.

हेही वाचा –

WHO : कोरोना लस आणि कर्णबधीरपणाचा काय संबंध ? WHO च्या अभ्यासाला सुरूवात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -