घरपालघरतंटामुक्त गाव समिती कागदावरच गावातील भांडण, तंटे पोलीस ठाण्यात

तंटामुक्त गाव समिती कागदावरच गावातील भांडण, तंटे पोलीस ठाण्यात

Subscribe

मात्र, आता नागरिक आपली तक्रार घेऊन थेट पोलीस ठाण्यात धडकत आहेत. परिणामी पोलिसांकडेही तपास प्रलंबित राहत आहेत.

वाडा :तालुक्यातील ग्रामीण भागातील तंटामुक्त समिती आता सुस्त झाली आहे. ही समिती कागदावरच उरली आहे. लोकांचा समितीवरील विश्वास उडला आहे. त्यामुळे आता गावातील भांडण, तंटे थेट पोलीस ठाण्यात पोचत आहेत. तंटामुक्त समित्या निष्क्रिय झाल्याने गावातील भांडणे पोलीस ठाण्यात पोहोचत असून, पोलिसांवरील कामाचा ताण वाढला आहे. एकेकाळी महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या तंटामुक्त गाव मोहिमेला आता घरघर लागली आहे. गाव खेड्यातील भांडण, तंटे आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त समितीची योजना तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून 15 ऑगस्ट 1907 पासून सुरू झाली होती. तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस पाटील, सरपंच गावातून तंटामुक्त समिती अध्यक्ष यांच्या माध्यमातून गावातील तंटे गावातच सोडविण्याची तरतूद यात आहे.

काही काळ गावातील वाद गावातच मिटत असल्यामुळे ही योजना लोकप्रिय ठरली होती. विशेष म्हणजे तंटामुक्त गावासाठी पुरस्कार घोषित केल्याने बहुतांश गावातील नागरिक एकोपाने राहू लागले होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून या मोहिमेचा प्रभाव कमी होत गेला. कोरोना काळापासून मोहीम थंडावली आहे. गावातील छोटी भांडण, तंटे, पोलीस स्टेशनला जात आहेत. यात काही ठिकाणी राजकारण आणि तंटामुक्त समिती अध्यक्षांची पक्षपाती वागणूक कारणीभूत ठरत आहे. तंटामुक्त समित्या सक्रिय असताना गावातील तंटे गावातच मिटवले जात होते. ठाण्यावरील तक्रारींचा भार बर्‍याच अशी कमी होत होता. मात्र, आता नागरिक आपली तक्रार घेऊन थेट पोलीस ठाण्यात धडकत आहेत. परिणामी पोलिसांकडेही तपास प्रलंबित राहत आहेत.

- Advertisement -

अनेक वर्षांपासून तेच ते अध्यक्ष
गेल्या आठ-दहा वर्षांपासून समित्या त्याच आहेत. १५ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेऊन तंटामुक्त समिती अध्यक्षांची निवड केली जाते. मात्र काही ठिकाणी ग्रामसभा होतात. तर काही ठिकाणी ग्रामसभा होत नाहीत. या मुळे काही ठिकाणी ग्रामसभा घेतली जात असली तरी अध्यक्षांचा विषयच येत नाही. काही गावात तर अनेक वर्षांपासून एकच अध्यक्ष कायम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -