घरपालघरखासगी रुग्णालये, दवाखान्यात दरफलक बंधनकारक; रुग्णांची लूट थांबणार

खासगी रुग्णालये, दवाखान्यात दरफलक बंधनकारक; रुग्णांची लूट थांबणार

Subscribe

पालघर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी खासगी रुग्णालये व दवाखान्यांना बाहेर दर्शनी भागात दर फलक लावण्याचे आदेश दिले आहेत.

पालघर जिल्ह्यातील बहुतांश खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमधून रुग्णांची लूट चालवली असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेत पालघर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी खासगी रुग्णालये व दवाखान्यांना बाहेर दर्शनी भागात दर फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन हे आदेश दिल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. रुग्णालये आणि दवाखान्याबाहेरील दर्शनी भागामध्ये तपासणी शुल्क याचबरोबरीने शस्त्रक्रियागृहासह शस्त्रक्रिया शुल्क, नोंदणी शुल्क, तपासणी शुल्क, सल्ला देण्याचे शुल्क, समुपदेशन शुल्क, भूलतज्ञ शुल्क, खाटांचे शुल्क, प्राणवायू शुल्क, परिचारिका शुल्क व इतर शुल्क याबाबत मराठी भाषेतून ठळक दिसेल, असे फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे, असे आरोग्य विभागामार्फत काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

ग्रामीण जनतेची लूट लक्षात घेता असे आदेश काढणे आवश्यक होते. आदेश काढल्यानंतर ग्रामीण भागांमध्ये त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यंत्रणेमार्फत केली जाईल. त्यामुळे जागृकता येऊन सामान्य जनतेची होणारी गैरसोय व लूट दूर होईल.
– ज्ञानेश्वर सांबरे, उपाध्यक्ष तथा सभापती, आरोग्य समिती, जिल्हा परिषद पालघर

- Advertisement -

प्राथमिक टप्प्यात हे आदेश काढल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दर फलक लावले आहेत की नाहीत, याबाबत चौकशी व प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या रुग्णालये, दवाखाने व क्लिनिकच्या डॉक्टरांनी हे दरफलक लावलेले नाहीत. अशांना ते लावणे बंधनकारक करण्यात येणार असून नियम न पाळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणार असल्याचे अधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले. रुग्णालये आणि दवाखान्यांमधून रुग्णांची लूट सुरू आहे. त्यावर आळा घालण्यासाठी दरपत्रक दर्शनी भागात लावण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पालघर नागरिक कृती समितीचे अध्यक्ष सतीश दहिवले केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने खासगी रुग्णालये व डॉक्टरांना हे आदेश काढून ते पाळणे बंधनकारक केले आहेत.

हेही वाचा –

Parambir Singh : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -