घरपालघरसमुद्रकिनारी भरधाव कारने दहा पर्यटकांना चिरडले; एका महिलेचा मृत्यू

समुद्रकिनारी भरधाव कारने दहा पर्यटकांना चिरडले; एका महिलेचा मृत्यू

Subscribe

समुद्रकिनारी भरधाव वेगात कार चालवत असलेल्या इसमाने दहा पर्यटकांना चिरडले. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पालघर जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चिंचणी समुद्रकिनारी बुधवार, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. समुद्रकिनारी भरधाव वेगात कार चालवत असलेल्या इसमाने दहा पर्यटकांना चिरडले. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर समुद्रकिनारी असलेल्या पर्यटकांनी कार चालकाला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्याने बहुतेक लोक आपापल्या कुटुंबासोबत चिंचणी समुद्रकिनारी फिरायला आले होते. रोजच्या मानाने बुधवारी चिंचणी समुद्र किनाऱ्यावर जास्तच गर्दी दिसत होती. किनाऱ्यावर विविध खाद्यपदार्थांच्या गाड्या लागल्या असून तेथे खवय्यांनी भरपूर गर्दी केली होती. समुद्रकिनाऱ्यावरील वातावरण आनंदी व उत्साही भासत होते. अशातच या आनंदावर विरजण घालण्याचे काम एका कार चालकाने केले. भरधाव वेगात आपली कार घेऊन या कार चालकाने समुद्रकिनारी बेसावधपणे बसलेल्या दहा पर्यकांना अक्षरशः चिरडले.

या अपघातात हेतून खातू (वय ६८) हिचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले असून त्यातील तीन जणांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. जखमींवर प्राथमिक उपचार केंद्रात उपचार सुरू आहेत. दहा जणांना चिरडणाऱ्या कार चालकाला उपस्थित नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाले केले. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर नेहमीच मोटारसायकल व कारचालक भरधाव वेगात वाहने चालवत असतात. येथील नागरिक वेळोवेळी अशा वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी करतात. परंतु स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे वाहन चालक निर्धास्तपणे भरधाव वाहन चालवतात. बुधवारी घडलेली घटना लक्षात घेता आतातरी अशा वेगात वाहने चालवणाऱ्यांवर करवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

Wine : सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -