Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाचा निविदा घोटाळा ?

सार्वजनिक बांधकाम विभागाचा निविदा घोटाळा ?

Subscribe

म्हणूनच या कामांना स्थगिती दिली गेल्याचा आरोप होत आहेत. तसेच स्थगिती असतानाच या मंजूर कामांच्या निविदा कशा काढल्या जातात ? हा प्रश्नच असून या निविदा बोगस असल्याचा आरोप होत आहे.

ज्ञानेश्वर पालवे,मोखाडा : भ्रष्टाचाराचे कुरण अशी ओळख असलेल्या मोखाडा सार्वजनिक बांधकाम विभागात आणखी एका घोटाळ्याची भर पडली आहे. विकास कामांच्या नावाखाली दरवर्षी मोखाडा तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोटी रुपये दरवर्षीच खर्च केले जातात. परंतु प्रत्यक्षात येथील विकास मात्र होताना दिसत नाही. हा विकास फक्त अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांच्या चष्म्यातून पहायला मिळतोय, असा आरोप होत आहे.
मोखाडा तालुक्यामध्ये एसएच-78 या राज्य महामार्गाची लांबी ३७ किमी आहे तर एमडीआर रस्त्यांची लांबी 80 किमी आहे. या एवढ्याच लांबीच्या रस्त्यांवर 1200 कोटी रुपये खर्च झालेत तरीही रस्ते झालेले नसताना गेल्या महिन्याभरात जव्हार सा. बां. विभागाने 304 कोटी 36लाख 95हजार 787 रुपयांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. नव्या सरकारने सर्व विकास कामांना स्थगिती दिली होती. कोर्टाने ती स्थगिती उठवली असली तरीही महाराष्ट्र शासनाने ही स्थगिती अद्याप उठवलेली नाही. तरीही शासन स्थगिती उठवणारच हे गृहीत धरुन रोज फक्त मोखाड्याच्या रस्त्यांची टेंडर प्रसिद्ध होत आहेत. आधीच्या सरकारने नियमबाह्य व टक्केवारी घेऊन कामे मंजूर केली होती. म्हणूनच या कामांना स्थगिती दिली गेल्याचा आरोप होत आहेत. तसेच स्थगिती असतानाच या मंजूर कामांच्या निविदा कशा काढल्या जातात ? हा प्रश्नच असून या निविदा बोगस असल्याचा आरोप होत आहे.

आदिवासी बहुल असलेल्या मोखाडा तालुक्यात दरवर्षी विविध योजनांच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपये खर्च होतात. मात्र ते नेमके जातात कुठे ? हा संशोधनाचा विषय आहे. मोखाडा तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 25 हजार 625 एवढी असून तालुक्यात एकूण 59 महसुली गावे व 226पाडे आहेत तर 27 ग्रामपंचायती आहेत. या तालुक्याच्या विकासावर 1992ते 2022 या 30वर्षात विविध योजनांमधून 1200 कोटी खर्च झाले असल्याचा आरोप होतो आहे .मार्च 2023पर्यंत हा आकडा 1500 कोटींपेक्षा अधिक खर्च होणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु खर्‍या अर्थाने गाव खेड्याचा विकास होईल का हा खर्‍या अर्थाने प्रश्नच आहे . याबाबत अधिक माहितीसाठी मोखाडा सांबा विभागाचे विशाल अहिरराव यांना संपर्क साधला असता कोणतीही कामे चुकीची झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -