Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर पालघर मद्यपी कर्मचार्‍यावर सेवा समाप्तीची कारवाई

मद्यपी कर्मचार्‍यावर सेवा समाप्तीची कारवाई

Subscribe

भविष्यात अशा प्रकारचे दारुडे आणि कामचुकार कर्मचारी आढळल्यास तसेच मुख्यालयी न राहणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिला.

पालघर: तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मद्यपी कर्मचार्‍याकडून स्टाफ नर्स (पुरुष) चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकारामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या आदेशानुसार सदर कर्मचार्‍यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आदेशानुसार त्वरित मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद पालघर यांनी सदर कर्मचार्‍यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली. सदर कर्मचारी उधवा येथे स्टाफ नर्स (पुरुष) या पदावर कंत्राटी तत्वावर कार्यरत होता.

कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मद्यपान करुन होता, असा अहवाल वैद्यकिय अधिकारी, प्रा.आ.केंद्र उधवा यांनी सादर केलेला अहवाल प्राप्त झाल्यावर सदर कर्मचार्‍याच्या नियुक्ती आदेशातील नमुद सेवा व अटी शर्तीचे उल्लंघन झाल्याने तसेच सदर घटनेने शासनाची प्रतिमा मलिन झाल्याने संबंधित कर्मचार्‍यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली. भविष्यात अशा प्रकारचे दारुडे आणि कामचुकार कर्मचारी आढळल्यास तसेच मुख्यालयी न राहणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिला.

- Advertisement -

प्रशासनाने अपेक्षित कारवाई केल्याने प्रशासनाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. यापुढे मद्यपी कर्मचारी आढळून आल्यास त्यावर देखील त्वरित कारवाई करण्यात येईल.

– संदेश ढोणे, सभापती- आरोग्य व बांधकाम समिती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -