Eco friendly bappa Competition
घर पालघर विद्यालयात ’ थँक्स अ टीचर ’ अभियान

विद्यालयात ’ थँक्स अ टीचर ’ अभियान

Subscribe

शिक्षक हा समाजात महत्वाचा घटक असून नवनवी पिढी घडविण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो, असे प्रतिपादन गिरीवासी सेवा मंडळाचे सचिव दीपक कडलग यांनी केले.

मोखाडा : शिक्षकांबद्दल प्रेम, आदर आणि कृतज्ञता गिरीवासी सेवा मंडळ, कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि मातोश्री यशोदाबाई मुरलीधर मोहिते कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खोडाळा-जोगलवाडी या महाविद्यालयात ’ थँक्स अ टीचर ’ या उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी ’थँक्स अ टीचर’ उपक्रमातून या दिवशी एक दिवसाचे अध्ययन करून विद्यार्थी- शिक्षकाची भूमिका निभावली. त्या एका दिवसात विद्यार्थ्यांना आलेले शिकविण्याचे अनुभव शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. यावेळी प्राचार्य, शिक्षक आणि शिपायांचीही भूमिका विद्यार्थ्यांनी पार पाडली. शिक्षक हा समाजात महत्वाचा घटक असून नवनवी पिढी घडविण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो, असे प्रतिपादन गिरीवासी सेवा मंडळाचे सचिव दीपक कडलग यांनी केले.

तर चारित्र्याचे संवर्धन हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट असून शिक्षकाने आपले ज्ञान परिघा पुरते मर्यादित न ठेवता ज्ञानाच्या कक्षा रुंदावून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करायला हवे, असे मोलाचे मार्गदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रवर्तन काशीद यांनी केले. यावेळी उपप्राचार्य तुकाराम रोकडे, प्रा. रघुनाथ मोरे, प्रा.दिलीप भोये, गुरुनाथ टोकरे, प्रा. कैलास पाटील आदी. शिक्षकांनी आपल्या शिक्षकांप्रति आदरभाव व्यक्त करून मनोगते व्यक्त केली. यावेळी, गिरीवासी सेवा मंडळाचे खजिनदार भास्कर खोळंबे, प्रा. माधुरी अहिरे प्रा. मयुरी नागवंशी, प्रा. निखिल पगारे, प्रा. सचिन वळवी, प्रा. संजय मौळे, प्रा. नवीन वसावला आदी. शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडून भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

- Advertisement -

 

शिक्षकांना आम्हाला शिकवताना किती मेहनत घ्यावी लागते हे आज समजले. आज एका दिवसाच्या प्राचार्यांनी भूमिका निभावताना मोठी कसरत करावी लागली. शिक्षकांचे तास बसवणे, प्रत्येक शिक्षक वर्गावर गेला आहे की नाही बघणे, एखादा तास राहून गेलाय की काय यांसारखे कामे करताना किती कसरत करावी लागते हे अनुभवातून समजले.
– कु. नंदिनी काळे, विद्यार्थी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -