घर पालघर विद्यार्थ्याला शिक्षकांनी केलेली मारहाण उघड

विद्यार्थ्याला शिक्षकांनी केलेली मारहाण उघड

Subscribe

मात्र सात दिवसांपासून विद्यार्थी हा घरीच असून त्याच्यावर कोणत्याही प्रकारे उपचार चालू नव्हते.

वसई : वसई तालुक्यातील कामण येथील आदिवासी विकास विभाग डहाणू प्रकल्प अंतर्गत येणार्‍या अण्णासाहेब धामणे अनुदानित माध्यमिक शाळा कामण येथील इ.८ मध्ये शिक्षण घेणार्‍या नितीन धनजी मागी (वय १४ वर्ष ) या विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षकांनी मारहाण केली होती.अखेर ही घटना उघडकीस आली आहे. शाळेतील अधीक्षक पृथ्वी बोरसे यांनी २ सप्टेंबर रोजी शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास विद्यार्थ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर विद्यार्थ्याला दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार करून त्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी त्याच्या रामपूर (वरठापाडा ) डहाणू येथे घरी पाठवले.मात्र सात दिवसांपासून विद्यार्थी हा घरीच असून त्याच्यावर कोणत्याही प्रकारे उपचार चालू नव्हते.

विद्यार्थ्याची खालावत चाललेली प्रकृती तसेच ही घटना सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वाघात यांना समजल्यावर त्यांनी ही बाब उघड केली. या घटनेची गंभीरता लक्षात घेवून निर्भीड पत्रकार संघ कोकण विभाग प्रमुख माधव तल्हा, सामाजिक कार्यकर्ते अजय मेढा, अविनाश सोमण यांनी आश्रम शाळा व्यवस्थापक व संस्था संचालक यांना ही घटनेबाबत विचारणा केली. तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्याला उपजिल्हा रुग्णालय कासा येथे ९ सप्टेंबर रोजी रात्री दाखल केले.मात्र विद्यार्थीच्या बंरडीच्या हाडाला दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी वेदांत हॉस्पिटल धुंदलवाडी येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत डहाणू प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी शाळेतील जे दोषी शिक्षक असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल,असे सांगितले. मात्र या घटनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -