घरपालघरमिरा भाईंदरमधील बस थांबे बनले गोडाऊन; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

मिरा भाईंदरमधील बस थांबे बनले गोडाऊन; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

Subscribe

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत असणार्‍या बस थांब्यांना फुटपाथवर राहणार्‍या व निवारा नसणार्‍या लोकांनी गोडाऊन बनवून टाकले आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत असणार्‍या बस थांब्यांना फुटपाथवर राहणार्‍या व निवारा नसणार्‍या लोकांनी गोडाऊन बनवून टाकले आहे. बस थांब्यांच्या वरच्या रिकाम्या जागेत कपड्यांची गाठोडी, वस्तू आदी ठेवण्यात आलेली आहेत. प्रवासी बसची वाट पाहत भर ऊनात, कधी पावसात रस्त्यावर उभे राहतात. वाट बघत असताना त्यांना सावली भेटावी, या उद्देशाने बसस्थानक बनवण्यात आले. मात्र सर्व बस थांबे उघड्यावर राहणार्‍या लोकांनी आपल्या उदर निर्वाहचे साधन केल्याने प्रवशांना बसची वाट बघत थांबे सोडून रस्त्यावर उभे राहवे लागत आहे. स्थानिक नगरसेवक, महापौर, आयुक्त, पालिका अधिकारी यांचे याकडे लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मिरा भाईंदर शहरातील गोल्डन नेस्ट सर्कल ते काशिमिरापर्यंत असणार्‍या सर्व बसस्थानक यांच्यावर मिरा भाईंदर शहरात झाडू बनवणारे, व्यवसाय करणारे, रोजंदारीवर काम करणारे यांच्या रात्रीच्या वेळी राहण्याची सुविधा नसल्याने ते रस्त्यालगत असलेल्या बस स्थानक, फुटपाथवर व गटारावर चादर टाकून झोपण्या करतात. त्यांच्या डोक्यावर छप्पर नसल्यामुळे त्यांना थंडीत कुडकुडत रात्रभर उघड्यावर झोपून पुन्हा आपल्या उदरनिर्वाहाकरता कामावर जावे लागते. त्यांच्याकरता शौचालयाची सोय नसल्याने ते सर्व काही प्रातः विधी रस्त्याच्या कडेला उघड्यावर करतात. मात्र त्यामुळे सांडपाणी साचून मच्छर निर्माण होतात.

- Advertisement -

मिरा भाईंदर महापालिकेमार्फत गुरुवारी सकाळी प्रभाग क्रमांक ४ च्या कारवाईदरम्यान पालिका अधिकारी कांचन गायकवाड व प्रभाग सभापती प्रीती पाटील यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी सर्व बस थांब्यांवर ठेवण्यात आलेले सामान जप्त केले. त्या ठिकाणी बसलेल्या लोकांना देखील तेथून हटवण्यात आले. इतकेच नाहीतर काही ठिकाणी झाडावरदेखील झोपडी बांधून अतिक्रमण करण्यात आले होते. ते देखील तोडून टाकण्यात आले. पालिकेमार्फत सर्व अतिक्रमण व वस्तू हटवून बस स्थानक अतिक्रमण मुक्त करून त्यांना आलेले गोडाऊनचे रूप बदलून टाकण्यात आले आहे.

हेही वाचा – 

कोरोनाला आळा घालण्यासाठी स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोनची आवश्यकता – पंतप्रधान नरेंद्र मोदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -