घरपालघरतलावासाठीच्या जमिनीची मोजणीच चुकीची; जमीन मालकांची तक्रार

तलावासाठीच्या जमिनीची मोजणीच चुकीची; जमीन मालकांची तक्रार

Subscribe

मोखाडा तालुक्यातील डोल्हारा या गावाची पाण्याविषयी गंभीर समस्या आहे. परंतु २०१२ साली साठवण तलाव मंजूर झाला आणि त्याचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेतच आहे.

मोखाडा तालुक्यातील डोल्हारा या गावाची पाण्याविषयी गंभीर समस्या आहे. परंतु २०१२ साली साठवण तलाव मंजूर झाला आणि त्याचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेतच आहे. त्या तलावासाठी शेतकर्‍यांच्या संपादित केलेल्या जमिनीची भूमिअभिलेख विभागामार्फत मोजणी करण्यात आली होती. परंतु जमिनीचे मोजमापच चुकीचे आणि सात बाराप्रमाणे मोजमाप केले गेले नसल्याचा आरोप करीत शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे. साठवण तलावासाठी गावकर्‍यांनी दिलेल्या जागेचे व्यवस्थित मोजमाप झालेले नाही. त्यातच भूसंपादन झाल्यानंतर संबंधितांना अद्याप मोबदलाही देण्यात आलेला नाही. जमिनीचा वापर रस्ता आणि तलावासाठी केला जात असताना मोबादला दिला जात नसल्याने गावकरी नारज झाले आहेत.

तलावासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीची १९ ऑक्टोबर १८ रोजी फेरमोजणी करण्यात आली होती. परंतु त्यावेळी खातेदारांना विश्वासातच घेतले नव्हते. अंधारात ठेऊन मोजणी करून दिशाभूल केल्याचा आरोप जमीनमालक करीत आहेत. खातेदारांच्या सातबारा उतार्‍यातही अनेक चुका करण्यात आलेल्या आहेत. शंकर भागा जाधव यांचा सर्वे नंबर ७/१ असताना त्यांचा ७/२ असा दाखवण्यात आला आहे. लक्ष्मण बारकू जाधव व सखाराम भिका दिवा ह्या खातेदारांची जमीन पाण्याखाली गेली असतानाही त्यांचे नावच खातेदाराच्या यादीत समाविष्ठ करण्यात आलेले नाही. ही फसवणुक असून त्यामुळे आर्थिक नुकसान होणार असल्याची चिंता जमीनमालकांचा लागून राहिली आहे.
ठेकेदारांनी तलावासाठी काढलेल्या मातीचे ढिग शेतकर्‍यांच्या जमिनीत टाकले आहेत. ढिग काढले जात नसल्याने शेतकर्‍यांना शेतीही करता येत नाही. त्यामुळे त्यांचेही नुकसान होत आहे.

- Advertisement -

अकरा वर्षांपासून आम्ही खातेदार मोबदल्यापासून वंचित आहोत. अद्याप कुठल्याही प्रकारे आम्हाला मोबदला मिळालेला नाही आणि शासनाकडून जी पिकोटी मिळते तीही अजून मिळाली नाही. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत.
– शंकर भागा जाधव, खातेदार (डोल्हारा)

जमिनमालकांना अद्याप कोणताही लाभ मिळालेला नाही. ज्यांची जमीन पाण्याखाली जाईल त्यांच्या मुलांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, हेही आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. मोबदला आणि नोकरी दिली गेली नाही तर उपोषणाला बसू, असा इशारा जमिन मालकांनी दिला आहे. दरम्यान, प्रतिक्रीयेसाठी लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता एन. एस. मोहिते यांना मोबाईलवर कॉल केला असता त्यांनी प्रतिक्रीया दिली नाही.

- Advertisement -

हेही वाचा –

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक, संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -