घरपालघरएकावर एक इमारत दुमजली,अनधिकृत बांधकामांनी नगरी सजली

एकावर एक इमारत दुमजली,अनधिकृत बांधकामांनी नगरी सजली

Subscribe

एकीकडे सरावली परिसरात जि.प.शाळेच्या वर्गखोल्या आणि अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी जागा मिळत नसताना अनधिकृत इमारती उभ्या करण्यासाठी भूमाफीयांना मात्र सरकारी जागा आंदण दिल्यागत परिस्थिती आह

बोईसर : अनधिकृत बांधकामांमुळे बोईसर आणि परिसरात अक्षरक्ष: बजबजपुरी माजली आहे.महसूल विभागाच्या डोळ्यांदेखत आणि नाकावर टिच्चून बिनधास्त अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत.या बांधकांमांवर कारवाई करण्यास महसूल विभाग चालढकलपणा करीत असल्याने त्यांचा देखील या अनधिकृत बांधकामांना छुपा पाठींबा तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे.
बोईसरजवळील सरावली ग्रामपंचायत हद्दीत अवधनगर येथे नवापूर मुख्य रस्त्यालगतच सर्वे क्र.९२ प्लॉट क्र.२१ या भूखंडावर एका भूमाफीयाने दोन मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम पूर्ण केले आहे.या आधी २३ फेब्रुवारी २०२२ रोजी पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेऊन या जागेवरील अनधिकृत बांधकाम उध्वस्त केले होते.परंतु त्यानंतर अवघ्या वर्षभरातच या जागेवर पुन्हा दोन मजली अनधिकृत इमारत दिमाखात उभी राहिली आहे.वर्षभरापासून या अवैध इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्या विरोधात नागरिकांनी वारंवार तक्रारी करून सूद्धा कारवाई न करता बोईसरचे मंडळ अधिकारी आणि सरावलीचे तलाठी यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.दोन वेळा तोडक कारवाई करून सुद्धा पुन्हा त्याच जागेवर अवैध बांधकाम करण्यासाठी भूमाफीयांच्या हिंमतीला फक्त महसूल कर्मचार्‍यांचा बोचेपेपणा जबाबदार असल्याचे दिसत आहे.एकीकडे सरावली परिसरात जि.प.शाळेच्या वर्गखोल्या आणि अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी जागा मिळत नसताना अनधिकृत इमारती उभ्या करण्यासाठी भूमाफीयांना मात्र सरकारी जागा आंदण दिल्यागत परिस्थिती आह

 

- Advertisement -

मौजे सरावली येथील अनधिकृत दुमजली इमारत बांधकाम लवकरच निष्कासित करण्याची कारवाई केली जाईल.

– सुनील शिंदे,तहसीलदार पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -