घरपालघरकंटेनर कार्यालयाला महापालिकेचीच परवानगी?

कंटेनर कार्यालयाला महापालिकेचीच परवानगी?

Subscribe

वसई : विरार पूर्वेकडील नाना-नानी पार्कसमोरील रस्त्यावर जय भवानी कोकण संस्थेच्या नावाने थाटण्यात आलेल्या सुसज्ज कंटेनर कार्यालयाला वसई-विरार महापालिकेच्या अधिकार्‍यांनीच अप्रत्यक्ष परवानगी दिली असल्याचा खुलासा या संस्थेच्या अध्यक्षांनी केला आहे. तशी माहिती देणारे वृत्त संस्थेच्या अध्यक्षांनी सोशल मीडियावर प्रसारित केले आहे. खुद्द संस्थेच्या अध्यक्षांनीच प्रसारित केलेल्या या माहितीमुळे महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे.विशेष म्हणजे हे कार्यालय सुरू करण्यासाठी वसई-विरारमधील प्रतिष्ठित नेते व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा ओबीसी महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय पाटील यांनी आर्थिक मदत केल्याचा गौप्यस्फोटही या वृत्तात संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना उपशहर अध्यक्षांनी केल्याने या अतिक्रमणाला ‘राजकीय अभय असल्याचे लपून राहिलेले नाही. जय भवानी कोकण संस्थेच्या या अनधिकृत कार्यालयाला चक्क महावितरणने वीज मीटरही दिला आहे.

येथील नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने मनवेलपाडा परिसरात संस्थेचे हे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असल्याची भलामण जय भवानी कोकण संस्थेने या वृत्ताच्या माध्यमातून केली असली तरी; अशा प्रकारची कार्यालये भर रस्त्यात उभी करून सामान्य नागरिकांची ‘वाट अडवत कोणते समाजकार्य केले जात आहे? असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी केला आहे.
वाढती अतिक्रमणे ही वसई-विरारकरांची डोकेदुखी ठरलेली आहेत. अशात भररस्त्यांत बिनदिक्कत राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांच पालिका अधिकार्‍यांना हाताशी धरून सुसज्ज कंटेनर कार्यालये थाटत असतील तर दाद तरी कुणाकडे मागायची? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.
जय भवानी कोकण संस्थेचे हे कार्यालय बँक ऑफ बडोदा, वसई सहकारी बँक, अपना सहकारी बँक व अन्य नामांकित बँका व आस्थापनांची कार्यालये आणि नागरिकांच्या मार्गात अडथळा ठरत असताना महापालिकेचे अधिकारी मात्र साधी दखलही घ्यायला तयार नसल्याने नागरिकांनी पालिकेच्या कारभारावरच ताशेरे ओढले आहेत.

- Advertisement -

हा कंटेनर हटवण्यासंदर्भात प्रभारी सहाय्यक आयुक्त दयानंद मानकर यांच्याशी बोलणे झालेले आहे. त्यांनी सूचना करताच हा कंटेनर हटवला जाईल.
– हरिश्चंद्र जाधव, अतिक्रमण अधिकारी,
प्रभाग समिती ब

जय भवानी कोकण संस्थेला मी आर्थिक मदत केली होती. पण, त्यांनी रस्त्यावर कार्यालय थाटावे, असा त्याचा अर्थ नव्हता. त्यांचे जुने कार्यालय मोडकळीस आले होते. त्याला महापालिकेच्या नोटिसा आलेल्या होत्या. त्यासाठी त्यांनी मदत मागितलेली होती. अतिक्रमण करण्यासाठी नाही. – विजय पाटील, सरचिटणीस,
महाराष्ट्र काँग्रेस कमिटी

- Advertisement -

……………

हा कंटेनर रस्त्यावरून हटवण्यासंदर्भात प्रभारी सहाय्यक आयुक्त दयानंद मानकर यांना तातडीचे आदेश दिलेले आहेत.

अजित मुठेउपायुक्तवसई-विरार महापालिका

०००

महावितरणने या कार्यालयाला मीटर दिला हे खरे आहे. त्यांना हा मीटर बाँडवर देण्यात आलेला आहे. त्यासाठी सुरक्षा अनामतही घेतलेली आहे. या कार्यालयावर कुणाचा आक्षेप किंवा तक्रार असल्यास महावितरण तो कापेलअशी माहिती देण्यात आलेली होती. त्यासाठी प्रथमत: महापालिकेने आम्हाला तशी माहिती द्यायला हवी.

— गणेश साखरे सहाय्यक अभियंतामहावितरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -