Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर पालघर कोरोना काळात रानभाज्यांना सुगीचे दिवस; ग्रामीण भागासह शहरांमध्येही मागणी

कोरोना काळात रानभाज्यांना सुगीचे दिवस; ग्रामीण भागासह शहरांमध्येही मागणी

ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवात मोठ्या प्रमाणात रान भाज्यांची विक्री झाली असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाची विक्री लक्षणीय असल्याची माहितीसमोर आली आहे.

Related Story

- Advertisement -

ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवात मोठ्या प्रमाणात रान भाज्यांची विक्री झाली असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाची विक्री लक्षणीय असल्याची माहितीसमोर आली आहे. एरवी रानभाज्यांकडे बघत नसलेल्या अनेकांनी आता कोरोना काळात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी रानभाज्यांचे सेवन करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे यंदा रानभाज्यांच्या विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती रानभाजी विक्रेत्याने दिली. त्यामुळे कोरोना काळात रानभाज्यांना सुगीचे दिवस आल्याचे आणि या विक्रेत्यांनाही चांगले उत्पन्न मिळत असल्याचे चित्र आहे.

पावसाळा सुरू होताच ग्रामीण भागातील शेतकरी पेंढर, तेरा, खुरासणी, शेवग्याचा पाला, कवळा, टाकळा, खडक अंबाडी अशा विविध प्रकारच्या रानभाज्या शहरातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी घेऊन येतात. कोरोना टाळेबंदी आणि सततच्या निर्बधांमुळे गेल्यावर्षी शेतकऱ्यांना शहरामध्ये रानभाज्यांची विक्री करणे शक्य झाले नव्हते. या भाज्यांच्या विक्रीतून त्यांना थोडेफार उत्पन्न मिळते. गेल्यावर्षी हे उत्पन्न बुडाल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. यंदा मात्र चित्र वेगळे आहे. कोरोनाचा संसर्ग ओसरल्यामुळे बाजारपेठा पूर्वीसारख्या खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे या बाजारपेठांमध्ये रानभाज्यांची विक्री करणे शेतकऱ्यांना शक्य होत आहे. त्याचबरोबर राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरही रानभाज्या विक्री महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे आयुर्वेदिक वैशिष्ट्य आणि त्याची पाककृती याविषयी जनजागृती केली जात आहे. त्यामुळे अनेकजण रानभाज्यांच्या सेवनाकडे वळू लागल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

कोरोना काळात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नागरिकांकडून आहाराचे सेवन केले जात आहे. आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रानभाज्यांचे सेवन करीत आहेत. मधुमेह, पोटदुखी तसेच इतर काही आजारांवरही रानभाज्या फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे रानभाज्याच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे, असे एका विक्रेत्याने सांगितले. आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिक रोजगार उपलब्ध व्हावा, शहरी भागातील नागरिकांनाही रानभाज्यांचे महत्त्व कळावे आणि त्यांना सहजरित्या या भाज्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रानभाज्या महोत्सव केला जातो. यंदा करोनामुळे या भाज्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

हेही वाचा –

राणे-ठाकरे येणार एकाच मंचावर; सिंधुदुर्गात ऑक्टोबरमध्ये रंगणार राजकीय दशावतार?

- Advertisement -