घरपालघरबारा पाड्यांचा विकास खुंटला; नगरपंचायतीतून वगळण्याची मागणी

बारा पाड्यांचा विकास खुंटला; नगरपंचायतीतून वगळण्याची मागणी

Subscribe

मोखाडा नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर बारा पाड्यांच्या विकासाला खिळ बसली आहे. त्यामुळे बारा गावपाड्याने नगरपंचायतीमधून वगळण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मोखाडा नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर बारा पाड्यांच्या विकासाला खिळ बसली आहे. त्यामुळे बारा गावपाड्याने नगरपंचायतीमधून वगळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मोखाडा तालुक्यातील मोखाडा नगरपंचायतीची निर्मिती २०१६ मध्ये झाली. तालुक्याशेजारील १२ गावपाड्यांचा समावेश नगरपंचायतीमध्ये करण्यात आला. येथूनच खर्‍या अर्थाने १२ गावपाड्यांचा विकासाला घरघर लागली. मोखाडा ग्रामपंचायत असताना १२ गावपाड्यांतील ग्रामस्थांना अनेक सुविधांचा व योजनांचा लाभ मिळत असे. पंचायत समिती मोखाडामार्फत अनेक योजना राबवल्या जात होत्या. परंतु १२ गावपाड्यांचा समावेश मोखाडा नगरपंचायतीमध्ये झाल्याने व कार्यक्षेत्रात बदल झाल्याने पंचायत समिती मोखाडामार्फत राबवल्या जाणार्‍या योजना बंद झाल्या आहेत.

१२ गावपाडे हे नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेला कोणत्याही योजना राबवता येणार नाहीत, असे गावपाड्यातील ग्रामस्थांना पंचायत समितीकडून सांगण्यात आले. दुसरीकडे, १२ गावपाड्यांचा समावेश नगरपंचायतीमध्ये होऊनही कुठल्याही सुविधा योजना राबवल्या जात नसल्याने विकासाला घरघर लागली असून, विकास खुंटला आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.

- Advertisement -

नगरपंचायत मोखाडामधून आमच्या १२ गावपाड्यांना वगळा असा सूर येथील ग्रामस्थांच्यावतीने जोर धरू लागला आहे. पूर्वी मोखाडा ग्रामपंचायत असताना पिकांसाठी फवारणीची औषधे, शेतीबाबतची औजारे, बी बियाणे व शेती संबंधित योजना पंचायत समिती मोखाडा मार्फत राबवल्या जात होत्या. तसेच ग्रामपंचायत मोखाडा असताना कचर्‍याचा योग्य निवारा, पाण्याचा प्रश्न, सुलभ रस्ते, वीज, गटारे याबाबत १२ गावपाड्यांमध्ये थोडेफार तरी लक्ष दिले जात होते. परंतु २०१६ मध्ये मोखाडा नगरपंचायत झाल्यापासून काडीमात्र लक्ष दिले जात नसल्याबद्दल गावकरी संताप व्यक्त करत आहेत.

बारा गावपाड्यातील ग्रामस्थांनी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे निर्धार केला होता. दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत गावपाड्यांतील ग्रामस्थांना मतदानाविषयी व आपल्या मूलभूत अधिकारांबाबत जनजागृती निर्माण करून मतदानावरील बहिष्कार मागे घेण्यास लावले. पालघर जिल्हा संघटक लहानु डोबा, पालघर जिल्हा उपाध्यक्ष वसीम काजी, जव्हार मोखाडा सहसंपर्क प्रमुख इरफान शेख, मोखाडा तालुका अध्यक्ष ईश्वर धोंडगा, जव्हार तालुका अध्यक्ष नितीन मुरर्थडे, जिल्हा प्रमुख सल्लागार सदाशिव घ्यारे, तालुका उपकार्याध्यक्ष गणेश तुंबडे, पालघर तालुका महिला उपकार्याध्यक्षा शालिनी वानखेडे, युवा तालुका विकास सिंग, दिनकर वानखेडे यांनी गावकर्‍यांची बहिष्कार न टाकण्याबाबत समजूत घातली होती.

- Advertisement -

हेही वाचा –

Parambir Singh :फरार नोटीस रद्द करण्यासाठी परबीर सिंहांचा किला कोर्टात अर्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -