घरपालघरविधानसभा उपाध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर उपोषण स्थगित

विधानसभा उपाध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर उपोषण स्थगित

Subscribe

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपल्या दालनात मध्यस्थी करून मार्ग काढल्याने आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी डीएड, बीएड कृती समितीने सुरु केलेले आमरण उपोषण स्थगित केले.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपल्या दालनात मध्यस्थी करून मार्ग काढल्याने आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी डीएड, बीएड कृती समितीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले आमरण उपोषण स्थगित केले. आमदार सुनील भुसारा यांनी ही बैठक व्हावी यासाठी पुढाकार घेतला होता. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी व डीएडबीएड कृती समिती सदस्य यांनी एकत्रित निर्णय घ्यावयाचा आहे. शिक्षकांची रिक्त पदे व अनुसूचित क्षेत्रात बाहेरील जिल्ह्यातील किती शिक्षक काम करतात. शिक्षकांच्या बदल्यानंतर किती जागा रिक्त होणार याबाबत दोन दिवसात अहवाल तयार करून प्रस्ताव संचालक, आयुक्त शिक्षण यांना पाठवावा. दोन दिवसात संचालक, आयुक्तांनी त्या रिपोर्टवर शेरा मारून त्यांचा अहवाल शालेय शिक्षण विभागाकडे पाठवावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

सचिव शालेय शिक्षण यांनी या अहवालावर शेरा मारून करून तात्काळ वित्त विभाग यांच्या मंजुरीला पाठवावा. वित्त विभागाच्या मंजुरीसाठी १५ ते २० दिवसात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार सुनील भुसारा, खासदार राजेंद्र गावीत यांच्यासह सचिव, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत सर्व अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार उपोषण स्थगित करण्यात आले आहे. आमदार सुनील भुसारा यांनी आमच्या मागण्या पूर्ण करण्याचा शब्द दिला आहे. पण, आम्हाला लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल.
– दामू मौळे अध्यक्ष, आदिवासी डीएड, बीएड कृती समिती

पालघर जिल्ह्यातील स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची पेसा क्षेत्रातील सरळसेवा शिक्षक भरतीच्या फाईलला मंजुरी घेणे, रिक्त जागांवर पवित्र पोर्टलद्वारे भरती न करता पेसा कायद्याला धरून स्थानिक पातळीवर करणे, २०१४ च्या शालेय शिक्षण विभाग यांनी पालघर जिल्ह्यातील शिक्षण कर्मचारी बाबत काढलेल्या शासन निर्णयानुसार पालघर पेसा क्षेत्र विशेष शिक्षक भरती करणे आदी कामे मार्गी लावली जाणार आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहर झिरवाळ यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्याकडून हा प्रश्न मार्गी लागेल, अशी ग्वाही आमदार सुनील भुसारा यांनी दिल्यानंतर मंगळवारी रात्री उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, उपाध्यक्ष शिवा सांबरे, माजी बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – 

कमी दरात चहा, पाववडा विक्रीच्या संशयातून तरुणाचा खून

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -