घरपालघरदुचाकी चोरून ओलएलएक्सवर विकणारी टोळी गजाआड

दुचाकी चोरून ओलएलएक्सवर विकणारी टोळी गजाआड

Subscribe

गुन्हे शाखा २ चे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे यांच्या पथकाने कारवाई केली

दुचाकी गाड्या चोरून बनावट कागदपत्रे तयार करून ओएलएक्सवर विकणाऱ्या टोळीतील दोन जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शुभमकुमार शर्मा (२२) आणि रोहन सिंग (१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखा-२ चे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ही टोळी दुचाकी गाड्या चोरत असत. त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून त्या ओएलएक्सवर गाड्या विकत असत. पोलिसांनी कारवाईत १३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच टोळीने वसई विरारसह मुंबई आणि ठाणे परिसरात दुचाकी चोरीचे सात गुन्हे केल्याचे उजेडात आले आहे.

शुभमकुमार चोरी केलेल्या दुचाकीची घरातच लॅपटॉपवर बनावट कागदपत्रे बनवून ओएलएक्सवर विकत असे. दोघांनीही नालासोपारा, कापूरबावडी, कासार वडवली, नारपोली, कुंभारवाडा, एमएचबी कॉलनी बोरीवली, कस्तुरबा मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सात गुन्हे केले आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाच्या याच पथकाने तुळींज आणि माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून स्कूटर चोरणाऱ्या एका अल्पवयीन चोरट्याला अटक केली आहे. पोलिसांनी चोरलेल्या दोन्ही गाड्या जप्त केल्या आहेत. तर विरारमधील एका ज्वेलर्सला अर्धा किलो सोने देण्याच्या बहाण्याने पंधरा लाखांचा गंडा घालणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या याच पथकाने उत्तरप्रदेशातील प्रतापगड येथून अटक केली आहे. चंदन उदयराज सिहं उर्फ ठाकूर (३०) असे त्याचे नाव आहे. विरारमधील एका ज्वेलर्सला अर्धा किलो सोने देण्याच्या बहाण्याने तिघांनी पंधरा लाखाला गंडा घालून पलायन केले होते. ही घटना ३१ जानेवारीला घडला होता. यातील चंदन हा मुख्य आरोपी आहे. त्याच्या दोन साथिदारांचा माग पोलीस काढीत आहेत. त्याच्याकडून आठ लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -