Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर पालघर नुकसानग्रस्तांच्या व्यथा केंद्रापुढे मांडणार; केंद्रीय पथक प्रमुखांची माहिती

नुकसानग्रस्तांच्या व्यथा केंद्रापुढे मांडणार; केंद्रीय पथक प्रमुखांची माहिती

चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात विविध क्षेत्राचे झालेले नुकसान मोठे आहे, आम्ही पाहणी केल्यावर हे लक्षात येत आहे. नुकसान ग्रस्त यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्या व्यथा आम्ही सरकारी नोंदीवर घेतल्या असून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.

Related Story

- Advertisement -

चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात विविध क्षेत्राचे झालेले नुकसान मोठे आहे, आम्ही पाहणी केल्यावर हे लक्षात येत आहे. नुकसान ग्रस्त यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्या व्यथा आम्ही सरकारी नोंदीवर घेतल्या असून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे, तसा अहवाल केंद्राकडे मदतीसाठी सादर करणार असल्याचे केंद्रीय नुकसान पाहणी पथकाचे प्रमुख अभय कुमार यांनी सांगितले. पथक प्रमुख अभय कुमार यांच्यासह सहा जणांचे केंद्रीय पाहणी पथक गुरुवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते.

तौक्ते चक्रीवादळानंतर प्रथमच हे केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले. पालघरसह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही हे पथक पाहणी करणार असून नुकसानीचा आढावा घेणार आहेत. हा दौरा संपल्यावर सर्व नोंदींचा एकत्रित अहवाल सादर करून तो केंद्राकडे सादर केला जाणार आहे. पालघर जिल्ह्यात आलेल्या या केंद्रीय पथकाने सर्वप्रथम वसई येथील विविध नुकसान झालेल्या भागात भेटी दिल्या व तेथील शासकीय यंत्रणेचा आढावा घेतला.

- Advertisement -

महाराष्ट्रात जांभुळगाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहाडोली येथील नुकसानग्रस्त भागाला या पथकाने भेट दिली. पावसामुळे तसेच चक्रीवादळामुळे जांभळाचे मोठे नुकसान झाले होते. अनेक झाडे उन्मळून पडली तर जांभळाचे तयार फळ वादळी वाऱ्यासह पावसामुळे गळून गेली. तसेच फळालाही कीड लागली त्यामुळे जांभूळ उत्पादक आर्थिक कोंडीत सापडल्याची माहिती बहाडोलीच्या शेतकऱ्यांनी या पथकाला दिली. या पथकामध्ये असलेले कृषी विभागाचे संचालक आर पी सिंग यांनी झालेल्या नुकसानीची माहिती प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून घेतली. जांभूळ उत्पादक या वादळामुळे कसा संकटात सापडला याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांकडून सिंग यांनी जाणून घेतली. त्यानंतर सिंग यांनी जांभळाच्या बागांना भेट देऊन तेथील वस्तुस्थिती जाणून घेतली. हि टपोरी जांभळे प्रसिद्ध असल्याने जांभूळ व्यापार वृद्धीसाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित असल्याचे यावेळी सिंग यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यासाठी शेतकऱ्यांनी मर्यादित जांभळाच्या झाडांवर अवलंबून न राहता जांभळाचे जास्तीत जास्त झाडे लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी शेतकऱ्यांबरोबर संवाद साधून त्यांच्या व्यथा आपुलकीने जाणून घेऊन त्या शासकीय दप्तरी नोंद करत असल्याची माहिती दिली.

शासन अशा नुकसानग्रस्तांच्या पाठीशी असून जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची नोंद घेऊन तसा अहवाल केंद्राकडे सादर केला जाणार असल्याची माहितीही या पथकाने दिली. पुढे या पथकाने धुकटन येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जिल्हाधिकारी कार्यालयात पालघर जिल्ह्यातील झालेल्या नुकसानी बाबतचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर किनारपट्टी भागात झालेल्या नुकसानीबाबत मच्छीमारांसोबत चर्चा करून त्यांच्या व्यथा ही जाणून घेतल्या. या पथकात केंद्रीय मंत्रालयातील वित्त्त्त विभागाचे संचालक व पथक प्रमुख अभय कुमार यांच्यासह केंद्रीय प्रशासनिक अधिकारी अशोक कुमार परमार, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता जे. के राठोड, कृषी मंत्रालयाचे आर. पी. सिंग, नवी मुंबई येथील कार्यकारी अभियंता देवेंद्र चाफेकर तसेच केंद्रीय मत्स्य वैज्ञानिक अशोक कदम यांचा समावेश होता.

हेही वाचा –

- Advertisement -

Good News ! मॉन्सून सोमवारी महाराष्ट्रात दाखल होणार, ‘या’ जिल्ह्यात हजेरी लागणार

- Advertisement -