घरपालघरधोकादायक ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न गंभीर

धोकादायक ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न गंभीर

Subscribe

त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला विरारमधील मनवेलपाडा येथून कारगिल नगर येथे निघालेल्या मिरवणुकीदरम्यान तब्बल सहा जणांना विजेचा जबर धक्का लागला होता.

वसईः डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत ट्रान्सफॉर्मवरला रॉड चिकटून विजेचा शॉक लागल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला होता.त्यामुळे आता वसईतील उघड्या ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न चिंतेचा विषय बनला आहे. वसई, नालासोपारा व विरार शहरात दाटीवाटीने असलेल्या अनेक लोकवस्ती आहेत. या लोकवस्तीत जाण्याकरता चिंचोळे रस्ते आहेत. त्याच रस्त्यांवर महावितरणचे ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब बसवण्यात आलेले आहेत. याच खांबांवरून रस्तोरस्ती लोंबकळणार्‍या वीजवाहिन्या गेलेल्या आहेत. यातील बहुतांश ट्रान्सफॉर्मर सभोवती आणि लोंबकळणार्‍या वीजवाहिन्यांखाली असलेले फेरीवाले, बॅनर व अन्य अडगळीच्या वस्तू यामुळे भविष्यात जिवितहानीच्या घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला विरारमधील मनवेलपाडा येथून कारगिल नगर येथे निघालेल्या मिरवणुकीदरम्यान तब्बल सहा जणांना विजेचा जबर धक्का लागला होता.

यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी असून, त्यांचीही प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेनिमित्ताने वसई महावितरणचा निष्काळजी व भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे.विरार पश्चिमेकडील बोळींज येथील मथुरा कॉम्प्लेक्समध्ये राहणार्‍या तनिष्का कांबळे (१५) या विद्यार्थिनीलाही १६ ऑगस्ट २०२२ महावितरणच्या निष्काळजीमुळे आपला प्राण गमवावा लागला होता. त्यावेळी महावितरणविरोधात सर्वसामान्य जनतेच्या सहभागात मोर्चाचे आयोजनही करण्यात आलेले होते. मात्र महावितरणच्या निष्क्रिय आणि कामचुकार अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केलेले आहे. याचे परिणाम म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला निघालेल्या मिरवणुकीतील दोघा तरुणांचा विजेचा झटका लागल्याने नाहक बळी गेला असल्याचा आरोप शिवसेनेने( उद्धव बाळासाहेब ठाकरे) केला आहे.

- Advertisement -

 

वसई महावितरणला निवेदन

- Advertisement -

वसई शहरातील धोकादायक ठिकाणांची सुरक्षा तपासणी करून रस्तोरस्ती लोंबकळणार्‍या वीजवाहिन्या सुरक्षित करण्यात याव्यात, गंजलेले-मोडकळीस आलेले, वीज प्रवाह उतरत असलेले वीज खांब बदलण्यात यावेत, भररस्त्यात असलेल्या धोकादायक ट्रान्सफॉर्मर सभोवती सुरक्षा कुंपण करण्यात यावे किंवा काढून अन्यत्र हलवण्यात यावेत, ट्रान्सफॉर्मवर राजकीय पक्ष व अन्य संस्थांचे टांगण्यात आलेले फ्लेक्स, बॅनर व होर्डिंग्ज काढून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, ट्रान्सफॉर्मर सभोवतील असलेल्या फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने वसई महावितरणला देण्यात आले. शिवसेनेच्या पालघर जिल्हा महिला आघाडी संघटक किरण चेंदवणकर, वसई विधानसभा संघटक विनायक निकम, उपजिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर व अन्य सहकार्‍यांच्या उपस्थितीत महावितरणला देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -