घरपालघरपोलिसांच्या तावडीतून पळालेला मारेकरी दीड वर्षांनी जेरबंद

पोलिसांच्या तावडीतून पळालेला मारेकरी दीड वर्षांनी जेरबंद

Subscribe

याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात २९ मे २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता.

मोखाडाः खूनप्रकरणात अटकेत असलेल्या मारेकर्‍याला वैद्यकीय तपासणीसाठी त्र्यंबकेश्वर येथे नेले जात असताना तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. त्याला पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दीड वर्षांनी निफाड तालुक्यातील विंचूर गावातून अटक केली आहे. विजय नाना चौधरी (२८, रा. सडकवाडी, मोखाडा) असे त्याचे नाव आहे. एका खुनाच्या गुन्ह्यात मोखाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून २५ मे २०२२ रोजी विजय चौधरीला अटक केली होती. वैद्यकीय तपासणीसाठी त्र्यंबकेश्वर येथे नेले असताना विजय चौधरी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात २९ मे २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता.

मे २०२२ पासून फरार झालेल्या विजय चौधरीचा माग पोलीस काढत होते. त्याला पकडण्याचे आदेश पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधिक्षक पंकज शिरसाट यांनी दिले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रविंद्र वानखेडे, पोलीस हवालदार दीपक राऊत, नरेंद्र पाटील, दिनेश गायकवाड, कैलास पाटील यांच्या पथकाने विजय चौधरीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. यापथकाने कौशल्यपूर्ण तपास करून विजय चौधरीला निफाड तालुक्यातील विंचुर गावाजवळील एका शेतातून ताब्यात घेतले. अटक करण्यात आल्यानंतर विजयला मोखाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -