घरपालघरधक्कादायक प्रकार ! विरारच्या किल्ल्याची जागाच विकली

धक्कादायक प्रकार ! विरारच्या किल्ल्याची जागाच विकली

Subscribe

मांडवी किल्ल्याच्या कोटाच्या प्रवेशाव्दाराजवळील जागा माजी सरपंचानेच बनावट कागदपत्रे तयार करून विकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी श्रमजीवी संघटना, किल्ले वसई मोहिम आणि युवा प्रतिष्ठान आक्रमक झाले असून येत्या २८ ऑगस्टला आंदोलन केले जाणार आहे.

वसई: विरार पूर्वेकडील मांडवी किल्ल्याच्या कोटाच्या प्रवेशाव्दाराजवळील जागा माजी सरपंचानेच बनावट कागदपत्रे तयार करून विकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी श्रमजीवी संघटना, किल्ले वसई मोहिम आणि युवा प्रतिष्ठान आक्रमक झाले असून येत्या २८ ऑगस्टला आंदोलन केले जाणार आहे.

मांडवी किल्ला कोटाच्या प्रवेशद्वाराजवळील जागा माजी सरपंचानानेच ४ लाख रुपयांना विकली असल्याचे समोर आले आहे. पोर्तुगीज आणि चिमाजी आप्पांच्या काळातील हा कोट आहे. कोटाची जागा वन विभागाच्या अखत्यारीत आहे. याठिकाणी किल्ल्याच्या परिसरातील १०० मीटर अंतरावर जागा खरेदी किंवा विक्री करता येत नाही. असे असतानाही माजी सरपंचाने जागा विकण्याचा पराक्रम केला आहे. त्यासाठी प्रवेशाव्दारासमोर घर नसतानाही खोटी घरपट्टी बनवण्यात आली आहे. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे जागा विकण्याचे काम करण्यात आले आहे.याबाबत माजी नगरसेविका अनिता धागडा यांनी वन विभागासह राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, वसई विरार महापालिका आयुक्त , तहसीलदार यांच्याकडे याप्रकरणी तक्रार केली आहे. गेली १९ वर्षे किल्ला स्वच्छतेसाठी काम करणार्‍या किल्ले वसई मोहीम, युवा प्रतिष्टान या संस्थाही आक्रमक झाल्या असून , सर्वांनी २८ ऑगस्टला आंदोलनाची हाक दिली आहे.

- Advertisement -

गडकोटांची अवस्था दयनिय

पुरातत्व विभागाकडून गडकोटांच्या संरक्षणाकडे होणारे दुर्लक्ष, लोकांमध्ये असलेली अनास्था यामुळे गडकोटांची अवस्था दिवसागणिक केविलवाणी होत आहे. पालघऱ जिल्ह्यातील गडकोटांचे जतन, संरक्षण व्हावे यासाठी काही संघटना कार्यरत आहेत. पण, त्यांना मर्यादा असल्याने जिल्ह्यातील बहुतांश गडकोटांची अवस्था दयनिय झाली आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील अनेक किल्ले आणि जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. काही ठिकाणी राजरोसपणे दारू विकण्याचे प्रकारही समोर आले आहेत.

- Advertisement -

मांडवी कोटाच्या संवर्धनासाठी गेली १९ वर्षे आम्ही ६०० मोहिमा केल्या आहेत. आपले गड किल्ले आणि त्यांचा इतिहास पुढच्या पिढीसाठी जतन करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. पालघर जिल्ह्यातील अनेक गड कोटाबाबत केंद्र आणि राज्य शासनाच्या पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षपणामुळे आपला ऐतिहासिक ठेवा नामशेष होत आहे. याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार असून , यासाठी दुर्ग संवर्धनासाठी काम करत असलेल्या अनेक संघटना आमच्याबरोबर आंदोलनात सहभागी होणार आहेत.

श्रीदत्त राऊत, इतिहास अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -