घरपालघरशिक्षक टेट पात्रता धारकांचा लाँग मार्च अखेर रद्द

शिक्षक टेट पात्रता धारकांचा लाँग मार्च अखेर रद्द

Subscribe

या मोर्चास पाठिंबा देण्यास डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले सुद्धा मोर्चात सहभागी झाले होते.

डहाणू:  पालघर जिल्ह्यातील डीएड पदवीधारक तसेच एट पात्रताधारकांना टीईटी आणि सीटीईटीत शिथिलता देऊन आदिवासी अनुसूचित पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र राज्य सरकार याबाबतीत सकारात्मक निर्णय घेत नसल्याने पालघर जिल्ह्यातील हजारो उमेदवार 5 फेब्रुवारीला तलासरी येथून मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावरून मंत्रालयावर मोर्चा घेऊन निघाले होते.पण मोर्चात येऊन पालघर जिल्हा शिक्षण अधिकारी संगीता भागवत यांनी शिक्षण मंत्र्यांचे उद्या बैठकीला येण्याचे पत्र दिल्यामुळे सदर धडक मोर्चा स्थगित केला गेला. सोमवारी सकाळी 11वाजता या लाँग मोर्चात तीनशे ते साडे तीनशे महिला व पुरूष उमेदवार मोर्चात सहभागी झाले. या मोर्चास पाठिंबा देण्यास डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले सुद्धा मोर्चात सहभागी झाले होते.

त्याच बरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, तलासरी तालुकाप्रमुख आशीर्वाद रिंजड, पालघर जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी आणि मोठ्या प्रमाणात उमेदवार सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. पण मोर्चा सुरु होताच काही वेळातच पालघरच्या शिक्षण अधिकारी संगीता भागवत यांनीआपल्या सहीचे पत्र देत शिक्षण मंत्री तसेच पालक मंत्री यांचे खाजगी सचिव यांनी ता. 6 रोजी सकाळी 9.30वाजता दोन ते तीन जणांचे शिष्टमंडल घेऊन मंत्रालयात बैठकीसाठी बोलवले आहे,असे पत्र दिले. यामुळे अखेर हा लाँग मार्च काही काळापुरता रद्द केला गेला. या प्रश्नांसाठी दहा दिवसाचे उपोषण करण्यात आले होते.मात्र तीन महिन्यानंतरही दखल घेतलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. आजच्या मोर्चात मनु दुबळा, कमलेश मान ,विजय गुहे, आशिष डोंगरे, गीता थापड, रवींद्र तांडेल, शेकडो महिला, पुरूष उमेदवार सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -