पालघर: विरार -डहाणू रेल्वे चौपदरीकरण, डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोर, वेस्टर्न रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्त बैठक खासदार राजेंद्र गावित व जिल्हाधिकारी पालघर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ही बैठक पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत केळवे रोड येथील पूर्व -पश्चिम रेल्वे भुयारी मार्गात गेल्या अनेक दिवसापासून पावसाचे पाणी भरून असल्याने तसेच वंजारवाडा बोईसर येथे अंडरपास ऐवजी फ्लाय ओव्हर ब्रिज त्याचप्रमाणे, टेपाचापाडा साईनगर येथे पादचारी पुल संदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.कोकण विभागात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे पालघरसारख्या भागात सुद्धा पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग न करता फ्लायओव्हर ब्रिज अथवा पादचारी पूल बांधावेत असे निर्देश संबंधितांना देण्यात आले. या करिता रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकत्रित प्रस्ताव तयार करावेत.तसेच खासदारांनी स्वतः वैयक्तिक रेल्वे बोर्डाशी संपर्क करून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
रेल्वे उड्डाणपूलासंदर्भात बैठक संपन्न
written By My Mahanagar Team
palghar
त्यामुळे या ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग न करता फ्लायओव्हर ब्रिज अथवा पादचारी पूल बांधावेत असे निर्देश संबंधितांना देण्यात आले.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
संबंधित लेख
वेलंकनी यात्रेकरूंची दक्षिण रेल्वेकडून उपेक्षा
वसईः दक्षिणेतील तामिळनाडू राज्यात नागापटिनम जवळ ख्रिस्ती धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सुप्रसिद्ध वेलंकनी मातेच्या तीर्थस्थानी प्रत्येक वर्षी मोठा वार्षिक महोत्सव होत असतो. या महोत्सवात सहभागी...
मध्य रेल्वेनंतर हार्बर लाईनच्या ‘या’ चार रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे पाठोपाठ आता हार्बर लाईवरील चार स्थानकांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडूनला 130 कोटी रुपयांच्या...
रस्त्यांवरून जुंपली! महापालिका म्हणते खड्डे आम्ही बुजवायचे आणि महसूल तुमच्या खिशात; MMRDA, MSRDC ला सुनावलं
मुंबई: रस्त्यांची जबाबदारी, दुरुस्ती, त्यासाठी होणारा खर्च आणि जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न यावरून मुंबई महापालिकेने नाराजीचा सूर आवळला आहे. रस्ते दुरुस्तीचा खर्च आम्ही करायचा आणि...
- Advertisment -
Advertisement