घरपालघरआमदार क्षितीज ठाकूर यांच्या पुढाकाराने नायगाव उड्डाणपूल लोकांनीच केला खुला

आमदार क्षितीज ठाकूर यांच्या पुढाकाराने नायगाव उड्डाणपूल लोकांनीच केला खुला

Subscribe

तयार होऊन दोन महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला नायगावचा पूर्व-पश्चिम उड्डाणपूल अखेर लोकांनीच खुला केला. बहुजन विकास आघाडीने पुढाकार घेत उमेळ्याचे माजी सरपंच भालचंद्र चौधरी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन केले.

तयार होऊन दोन महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला नायगावचा पूर्व-पश्चिम उड्डाणपूल अखेर लोकांनीच खुला केला. बहुजन विकास आघाडीने पुढाकार घेत उमेळ्याचे माजी सरपंच भालचंद्र चौधरी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन केले. हा पूल सुरू झाल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आमदार क्षितीज ठाकूर उपस्थित होते. नायगावमधील रहिवाशांना पूर्व-पश्चिम वाहतूक करण्यासाठी आतापर्यंत खूप कष्ट पडत होते. तसेच हा उड्डाणपूल नसल्याने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालाही नायगाव जोडले गेले नव्हते. पण आठ वर्षांपूर्वी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या सततच्या प्रयत्नांनी या प्रकल्प मंजूर झाला होता. उमेळा गावाचे तत्कालीन सरपंच भालचंद्र चौधरी यांच्या हस्ते या पुलाचे भूमीपूजन झाले होते.

त्यानंतर विविध प्राधिकरणांच्या परवानग्या, मिठागार विभाग, रेल्वे विभाग यांच्याशी समन्वय साधून, सातत्याने पत्रव्यवहार व भेटीगाठी करून बहुजन विकास आघाडीने या पुलाचे काम लवकर होण्यासाठी प्रयत्न केले. यात आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर यांनी पुढाकार घेतला. अखेर दोन महिन्यांपूर्वी या पुलाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर एमएमआरडीएचे अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्यासह आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या पुलाची पाहणीदेखील केली. तरीही एमएमआरडीएला पुलाच्या उद्घाटनासाठी मुहूर्त सापडत नव्हता. लोकार्पण लवकरात लवकर होईल, असे सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात लोकांना प्रतीक्षाच करावी लागत होती.

- Advertisement -

याबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी लक्षात घेत आमदार क्षितीज ठाकूर यांनी पुढाकार घेत बुधवारी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि स्थानिक यांच्या उपस्थितीत माजी सरपंच भालचंद्र चौधरी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन केले. त्यामुळे सरकारला जी गोष्ट जमली नाही, ती बहुजन विकास आघाडीने करून दाखवल्याची चर्चा रंगली होती.
पूल उभारून तयार होता. सर्व पाहणीही झाली होती. तरीही तो पूल उद्घाटनाअभावी लोकांना वापरण्याची परवानगी नव्हती. यामुळे लोकांना होणारा मनस्ताप योग्य नसल्याचे लक्षात आल्यानंतरच उद्घाटनाचा निर्णय घेतल्याचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –

आपल्यावरील हल्ल्यांची सीबीआय मार्फत चौकशी करा, किरीट सोमय्या यांची उच्च न्यायालयात याचिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -