घरपालघरओबीसींचे वादळ उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

ओबीसींचे वादळ उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

Subscribe

ओबीसींना राजकीय आरक्षणासह विविध मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातील ओबीसी समाज एकटवला असून आपल्या मागण्यांसाठी शुक्रवारी, २९ एप्रिल रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.

ओबीसींना राजकीय आरक्षणासह विविध मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातील ओबीसी समाज एकटवला असून आपल्या मागण्यांसाठी शुक्रवारी, २९ एप्रिल रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. यात केंद्रीय मंत्री कपिल पाटील, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांसह अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. केंद्र वा राज्यस्तरावर जातीनिहाय जनगणना झालेली नाही. त्याचे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत. महाराष्ट्रातील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. पालघर जिल्ह्यात पेसा लागू करताना १९८१ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण शून्यावर येण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे ओबीसी समाजात आक्रोश निर्माण झाला असून ओबीसी हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून लढ्याला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.

ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. ओबीसींना राजकीय राजकारण मिळालेच पाहिजे. पेसा अधिनियमाच्या तरतूदी विचारात घेऊन ओबीसींना कायदेशीर मिळत असलेले राजकीय आरक्षण कायम ठेवण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता झारखंड शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढून स्वतंत्र कायदा त्वरीत कारवा. आदिवासीबहुल जिल्ह्यात कमी केलेले ओबीसी आरक्षण पूर्ववत करावे. सरकारी नोकरीतील ओबीसींचा बॅकलॉग त्वरीत भरण्यात यावा. महाज्योती व इतर मागास आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधी द्यावा. पालघर जिल्ह्यातील स्थगित नोकरभरती लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण ठेऊन त्वरीत करावी. केंद्रीय अर्थसंकल्पात ओबीसींच्या कल्याणार्थ केंद्रात व राज्यात भरीव आर्थिक तरतूद करावी, आदी मागण्या ओबीसी हक्क संघर्ष समितीने केलेल्या आहेत.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री कपिल पाटील, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार राजेंद्र गावित, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार हितेंद्र ठाकूर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, आमदार रविंद्र फाटक, आमदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर, आमदार किसन कथोरे, आमदार मनिषा चौधरी, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार सुनील भुसारा, आमदार राजेश पाटील, टीडीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार विनोद निकोले, आमदार शांताराम मोरे, आमदार बाळाराम पाटील, आनंद ठाकूर, श्रीविश्वनाथ पाटील आदी नेते मोर्च्यात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा –

आपल्यावरील हल्ल्यांची सीबीआय मार्फत चौकशी करा, किरीट सोमय्या यांची उच्च न्यायालयात याचिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -