घरपालघरअंतिम संस्कार करून पोलिसांचे पुण्यकर्म

अंतिम संस्कार करून पोलिसांचे पुण्यकर्म

Subscribe

तरी मृतदेहाच्या कफन पासून अन्य साहित्यासाठी लागणारा खर्च पोलीस स्वतःच्या खिशातूनच करतात. अनोळखी मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणे हे पुण्याचे कार्य मानून पोलीस अंत्यसंस्कारचा खर्च करतात.

इरबा कोनापुरे,भाईदर :- मीरा -भाईंदर व वसई -विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२२ सालात सापडलेल्या १७८ अनोळखी मृतदेहांपैकी १५८ बेवारस मृतदेहांवर पोलिसांनीच आपली खाकीची माणुसकी दाखवत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. बेवारस मृतदेहांवर महापालिकेच्या स्मशानभूमीत मोफत अंत्यविधी केला जात असला तरी मृतदेहाच्या कफन पासून अन्य साहित्यासाठी लागणारा खर्च पोलीस स्वतःच्या खिशातूनच करतात. अनोळखी मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणे हे पुण्याचे कार्य मानून पोलीस अंत्यसंस्कारचा खर्च करतात.

मीरा -भाईंदर व वसई -विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनोळखी मृतदेह आढळून येत असतात . समुद्र वा खाडी किनारी आढळून येण्यासह विविध कारणांनी अनोळखी व्यक्तींचे मृत्यू झाल्यास त्यांची ओळख पटवणे हे पोलिसां समोर आव्हान असते . अनेकवेळा ओळख पटली तरी वारस सापडत नाहीत . अनोळखी मृतदेह सापडल्यावर तो शवविच्छेदन व शवागारात नेण्याची तसेच त्याची ओळख पटवण्या पासून तो वारसांना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पोलिसच करतात . मृतदेहाचे वारस सापडावेत व त्यांची ओळख पटावी यासाठी मृतदेह ७ दिवस शवागारात ठेवला जातो . वारस सापडले नाही तर बेवारस म्हणून मृतदेहावर अंत्यविधी करण्याचे कार्य पोलीस पार पाडतात.
पूर्वी शासन वा पालिकेच्या शववाहिनी किंवा रुग्णवाहिका कमी असायच्या. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकांच्या चालकांना बोलवावे लागत असे. त्याचा खर्च सुद्धा पोलिसांना करावा लागायचा. मात्र कोरोनामुळे पालिका आणि शासनाच्या रुग्णवाहिका , शववाहिकांची संख्या वाढल्याने पोलीस त्याचाच वापर करतात.

- Advertisement -

 

मीरा भाईंदर परिमंडळ १ मध्ये २०२२ ह्या वर्षात ५३ अनोळखी मृतदेह आढळले. त्यातील केवळ ८ मृतदेहांची ओळख पटली. सरकारतर्फे म्हणजेच पोलिसांतर्फे तब्बल ४९ मृतदेहांवर अंत्य संस्कार करण्यात आले. वसई पोलीस परिमंडळ २ मध्ये वर्षभरात ५५ अनोळखी मृतदेह सापडले. त्यापैकी ५ मृतदेहांची ओळख पटली तर ५३ मृतदेहांवर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. विरार पोलीस परिमंडळ ३ मध्ये सर्वात जास्त ७० अनोळखी मृतदेह गेल्यावर्षी आढळले. त्यातील १२ मृतदेहांची ओळख पटली तर ५६ अनोळखी मृतदेहांवर पोलिसांनी अंत्यविधी केला.
&……………………………………………………………………………………….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -