घरपालघरपोलीस मुख्यालयाची जागा महापालिकेकडून हस्तांतरीत

पोलीस मुख्यालयाची जागा महापालिकेकडून हस्तांतरीत

Subscribe

या जागेचे हस्तांतर महापालिकेकडून पोलीस विभागाकडे करण्यात आले असून जागेचा सात-बारा उतारा पोलिसांच्या नावाने करण्यात आला आहे.

वसईः मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय मीरा रोड येथील प्लेझंट पार्क येथे होणार असून त्यासाठीचा भूखंड पोलीस विभागाच्या नावावर झाला असून मीरा भाईंदर महापालिकेने भूखंड पोलिसांकडे हस्तांतर केला आहे. इमारतीचा आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून आयुक्तालयाच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

१ ऑक्टोबर २०२१ रोजी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली. आयुक्तालयाला स्वतःची जागा नसल्याने सध्या मीरा भाईंदर महापालिकेच्या मीरा रोड़ येथील इमारतीत भाडेतत्वावर कार्यालय सुरु आहे. मीरा भाईंदर परिसरातच मुख्यालय बांधण्याचा पहिल्यापासूनच निर्णय घेतला गेल्याने मुख्यालयासाठी जागेचा शोध सुरु होता.  मीरा भाईंदर महापालिकेने पोलीस आयुक्तालय मुख्यालयासाठी  मीरा रोड येथील प्लेझंट पार्क येथे ( आरक्षण क्रमांक ३३४) ११ हजार ८८५ चौरस मीटर जमीन आरक्षित करण्यात आली आहे. या क्षेत्रापैकी सात हजार ३४६ चौरस मीटर क्षेत्र पोलीस विभागाच्या नावे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्याची बाजार भावानुसार असलेली २० कोटी रुपयांची किंमत मीरा भाईंदर महालिकेला अदा करण्यात आली आहे. या जागेचे हस्तांतर महापालिकेकडून पोलीस विभागाकडे करण्यात आले असून जागेचा सात-बारा उतारा पोलिसांच्या नावाने करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस आयुक्तालयाची मुख्यालयाच्या बांधकामासाठी मेसर्स संजय राजदान यांची वास्तूविशारद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इमारतीचा आराखडा आणि खर्चाचे अंदाजपत्रक अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. २०२२-२३ च्या निधीमधून पोलीस विभागाला करावयाच्या कामांमधून पोलीस आयुक्तालयाच्या कामाला प्राधान्य द्यावेअसे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना सांगितले. या कामासाठी चालू आर्थिक वर्षात निधी मिळावाअशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातच पोलीस आयुक्तालयाचे काम सुरू केले जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -