घरपालघरशिवसेनेच्या अंतर्गत कलाहामुळे स्वीकृत नगरसेवक पद रिक्त

शिवसेनेच्या अंतर्गत कलाहामुळे स्वीकृत नगरसेवक पद रिक्त

Subscribe

शिवसेना जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांचा हिरवा कंदील मिळत नसल्याने पालघर नगरपरिषदेचे शिवसेनेच्या कोट्यातील स्विकृत नगरसेवक पद अद्याप रिक्तच आहे. शिवसेनेच्या अंतर्गत कलाहामुळेच जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख याबाबत निर्णय घेत नसल्याचे सांगितले जाते.

शिवसेना जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांचा हिरवा कंदील मिळत नसल्याने पालघर नगरपरिषदेचे शिवसेनेच्या कोट्यातील स्विकृत नगरसेवक पद अद्याप रिक्तच आहे. शिवसेनेच्या अंतर्गत कलाहामुळेच जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख याबाबत निर्णय घेत नसल्याचे सांगितले जाते. पालघर नगरपरिषदेत शिवसेना सत्ताधारी आहे. गेली दोन वर्षे सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला आपल्या कोट्यातील स्विकृत नगरसेवकपदावर नेमणुक करता आलेली नाही. यापदावर कुणाची नेमणुक करायची यावरून शिवसेनेत प्रचंड वाद आहेत. जिल्हाप्रमुख राजेश शहा आणि जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांना स्वतःच्या मर्जीतील नगरसेवक नेमायचा आहे. त्यात घोडाबाजार होण्याची भिती अनेक पदाधिकार्‍यांना वाटत आहे. म्हणूनच संघटनेतील निष्ठावानाला संधी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यातून वाद होऊन स्विकृत नगरसेवकपदाचा तिढा गेली दोन वर्षे सुटलेला नाही.

पक्षासाठी जीवाचे रान करणार्‍यांना संधी दिली पाहिजे. अन्यथा पक्ष अधोगतीकडे जाईल.
– प्रभाकर राऊळ, जिल्हा समन्वयक, शिवसेना

- Advertisement -

शिवसेनेचे गटनेते कैलास म्हात्रे स्विकृत नगरसेवकपदाची निवडणुक घेण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवुन केली आहे. त्यामुळे स्विकृत नगरसेवकपदाचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येणार आहे. माजी उपनगराध्यक्ष रईस खान, माजी नगरसेवक अतुल पाठक,महिला उपशहर प्रमुखासह शहरातील काही वकिल स्विकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक आहेत. खान आणि पाठक मागच्या निवडणुकीत पराभूत झालेले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी का द्यायची असा निष्ठावानांचा प्रश्न आहे. त्याऐवजी निष्ठावानाला संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मी शिवसेनेत नवीन असल्याने ते अधिकार माझ्याकडे नाहीत. याबाबत पूर्ण अधिकार संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांच्याकडे आहेत.
– केदार काळे,सहसमनव्यक शिवसेना पालघर जिल्हा

- Advertisement -

दरम्यान, बहुजन विकास आघाडीतून भाजपमध्ये आलेल्या अरुण माने यांना भाजपने स्विकृत नगरसेवक पद देऊन पक्षवाढीचा प्रयत्न केला आहे. असे असताना शिवसेनेचे नेते मात्र पराभूतांना नगरसेवक बनवण्याची धडपड करीत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यातून स्विकृत नगरसेवकपदाचा तिढा सुटू शकलेला नाही.

(संजू पवार ः लेखक पालघर वार्ताहर आहेत)

हेही वाचा –

Coronavirus: काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -