घरपालघरऔद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल माफीयांचा त्रास

औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल माफीयांचा त्रास

Subscribe

दोन रुपये तीस पैशांनी घातक रासायनिक घनकचरा विल्हेवाट लावणारी गावगुंड टोळकी सक्रिय असून शासन प्रशासन या टोळक्यांवर कठोर कारवाई करत नाही तोपर्यंत हे अवैध कृत्य सुरूच राहणार असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

बोईसर : बोईसर – तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्याचा घातक रासायनिक घनकचरा बेकायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी काही गावगुंड केमिकल माफियांनी थैमान घातलेले असून आपल्याच गावातील शेती उपयोगी जमिनीवर हे घातक रासायनिक घनकचरा विल्हेवाट लावून सुपिक जमीन नापीक करण्याचे काम गावाचा केमिकल माफिया करत आहे. औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखानदार रासायनिक घनकचरा शासोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी येणारा लाखोंचा खर्च टाळण्यासाठी काही गावगुंड लोकांना हाताशी धरून हे अवैध कृत्य करत आहेत. (ता .०८ ) / ०९ फेब्रुवारी रोजी कुंभवली व कोलवडे गावाच्या वेशीवर राजेंद्र मॅकेनिकल कारखान्याच्या मागील बाजूस निर्जनस्थळी मालकी जमिनीवर तब्बल २०० लि. क्षमतेचे १७ लोखंडी ड्रम मधील घातक रासायनिक घनकचरा असलेला द्रव्य जमिनीवर ओतल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

घातक रासायनिक घनकचर्‍याची बेकायदेशीर विल्हेवाट लावणारे मोटार टँकर नेहमीच चर्चेत असल्यामुळे केमिकल माफियांनी अनोखी शक्कल लढवत २०० लिटरच्या पिंपात हे घातक रासायनिक द्रव्य भरून अशा निर्जनस्थळी विल्हेवाट लावली जात आहे. काही दिवसांपूर्वी बो केम कंपनीकडून ६४ पिंप भरून बेकायदेशीर वाहतूक करणारा असाच एक मोटार ट्रक बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतला होता.दोन रुपये तीस पैशांनी घातक रासायनिक घनकचरा विल्हेवाट लावणारी गावगुंड टोळकी सक्रिय असून शासन प्रशासन या टोळक्यांवर कठोर कारवाई करत नाही तोपर्यंत हे अवैध कृत्य सुरूच राहणार असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

- Advertisement -

याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी विरेंद्र सिंग यांना दुरध्वनी द्वारे कळविण्यात आले होते. परंतु सदर घटनेची तात्काळ दखल न घेतल्यामुळे रात्रीचा अंधाराचा फायदा घेत केमिकल माफियांनी पळ काढला.

– अमित संखे – उपसपंच ग्रुप ग्रामपंचायत कुंभवली एकलारे|

- Advertisement -

घटनास्थळी रासायनिक पिंप आढळून आल्याचे दुरध्वनीद्वारे उपसरपंच अमित संखे यांनी कळविले होते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वनियोजित सभा आयोजित असल्यामुळे घटनास्थळी तातडीने पोहचू शकलो नाही. सदर प्रकरणाची गांभीर्याता लक्षात घेता नमुने चाचणी होताच वरिष्ठांना अहवाल सादर केला जाईल.

– विरेंद्र सिंग – उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तारापुर २

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -