घर पालघर पालिका शाळांसाठी ठोक मानधनावर शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू

पालिका शाळांसाठी ठोक मानधनावर शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू

Subscribe

महापालिका शाळांमध्ये जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन मोफत व दर्जेदार शिक्षण प्राप्त करावे, यासाठी आयुक्तांनी शाळांचे नुतनीकरणास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या गणवेशात बदल करून आकर्षक गणवेश खरेदीस मान्यता दिली.

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका शाळांमध्ये गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यातच गेल्या वर्षी ९ वीचे व या वर्षी १०वी चे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यामुळे शिक्षकांची संख्या अपुरी पडत आहे. शिक्षकांची उणीव भरून काढण्यासाठी आयुक्तांनी इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या प्राथमिक शिक्षणासाठी ११ व ९ वी ते १० वी पर्यंतच्या माध्यमिक शिक्षणासाठी १५ अशा एकूण २६ शिक्षकांची ठोक मानधनावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने मंगळवारी शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. मीरा- भाईंदर महापालिका शाळेत गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच गेल्या दोन वर्षापूर्वी ८ वीचे वर्ग गेल्या वर्षी ९ वी व या वर्षी १० वी चे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. मनपा शाळेत गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे. विद्यार्थ्यांना सोई सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिल्या जात आहेत. खासगी शाळांप्रमाणेच मनपा शाळेतील मुलांना देखील शिक्षण मिळाले पाहिजे या हेतूने प्रशासन काम करत आहे. महापालिका शाळांमध्ये जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन मोफत व दर्जेदार शिक्षण प्राप्त करावे, यासाठी आयुक्तांनी शाळांचे नुतनीकरणास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या गणवेशात बदल करून आकर्षक गणवेश खरेदीस मान्यता दिली.

या शाळांमधील शिक्षण खासगी शाळांच्या तुलनेत दर्जेदार होण्यासाठी डिजिटल वर्ग सुरू केले. तसेच गणित व विज्ञान विषय इंग्रजी भाषेत शिकविण्यासाठी सेमी इंग्रजीचे शिक्षण सुरू केले. त्यासाठी पालिका शाळांतील शिक्षकांना इंग्रजीचे प्रशिक्षण दिले. प्रत्येक विषयातील तज्ज्ञ शिक्षकांसह इंग्रजी भाषेचे ज्ञान असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या प्राथमिक शिक्षणासाठी ११ व इयत्ता ९ वी ते १० वी पर्यंतच्या माध्यमिक शिक्षणासाठी १५ शिक्षकांची पदे ठोक मानधनावर भरण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील प्राथमिक स्तरावरील शिक्षणासाठी १२ तर माध्यमिक स्तरावरील शिक्षणासाठी २८ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. त्यांच्या थेट मुलाखती मंगळवारी घेण्यात आल्या. लवकरच पात्र शिक्षकांची अंतिम यादी निश्चित करून त्यांना शाळेवर निवड केली जाणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -