घरपालघरजुन्या पुलांचं सोनं करण्याचा कार्यक्रम उल्लेखनीय

जुन्या पुलांचं सोनं करण्याचा कार्यक्रम उल्लेखनीय

Subscribe

तर शाखा अभियंता विशाल मनाळे यांनी सांगितले की, संवर्धन व पुनर्जिवनाच्या कामांमध्ये पुलावर उगवलेली छोटी मोठी झाडे गवत इत्यादी पूर्णपणे काढून तेथे पुन्हा ही झाडे गवत उगवू नये म्हणून तिथे रसायन टाकून प्रक्रिया केली जाते.

मनोर : सिन्नर, घोटी, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मनोर, पालघर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 अ वरील वापरात असलेल्या जुन्या पुलांच्या संवर्धन व पुनर्जिवनाचा कार्यक्रम केंद्रीय भूतल परिवहन मंत्रालयाच्या सहाय्याने ठाण्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागानें हाती घेतलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160अ च्या किलोमीटर 176/२०० ( विक्रमगड) ते 197/२०० ( जव्हार फाटा) या लांबीतील पूर्णपणे दगडी बांधकाम असलेल्या देहर्जे पुलाचे पुनर्जीवनाचे काम हाती घेण्यात आलेले असून डिसेंबर 2022 रोजी पूर्ण करण्यात आलेले आहे,अशी माहिती वसईच्या राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे उपविभागीय अभियंता विकास पिंपळकर यांनी सांगितले.

तर शाखा अभियंता विशाल मनाळे यांनी सांगितले की, संवर्धन व पुनर्जिवनाच्या कामांमध्ये पुलावर उगवलेली छोटी मोठी झाडे गवत इत्यादी पूर्णपणे काढून तेथे पुन्हा ही झाडे गवत उगवू नये म्हणून तिथे रसायन टाकून प्रक्रिया केली जाते.पुलाच्या दगडी बांधकामांमध्ये असलेल्या चिरा बर्‍याच प्रमाणात निखळून आलेल्या आहेत. त्या चिरा पूर्णपणे साफ करून इपोक्सी रेझिंग या रासायनिक केमिकल मटेरियलने त्या चिरा ग्राऊट करण्यात आलेल्या आहेत. तसेच वरच्या भागात इपॉक्सी पाँटिंगचे काम करण्यात आलेले आहे. यामुळे पुलाचे मूळ दगडी बांधकामाची ताकद वाढवण्यात आलेली आहे व पुलाला अँटी कार्बोनेशन पेंट करून पूल सुशोभित करण्यात आलेला आहे. तसेच पुलावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेले साईड ड्रेन विप होल्स इत्यादी यंत्रणा दुरुस्त करून पावसाचे पाणी वाहून जाण्याची पुलावरील बंद पडलेली यंत्रणा पूर्णपणे पुनर्जीवित करण्यात आलेली आहे.पुलाच्या दोन्ही बाजूला असलेला भराव पावसात वाहून जाऊ नये म्हणून त्या भरावाला दगडाचे पिचिंग करून संरक्षित करण्यात आलेले आहे आणि पुलाची ताकत वाढविण्यासाठी आवश्यक त्या ट्रीटमेंट केल्या जातात.

- Advertisement -

देहर्जे पुलाचे वरील प्रमाणे संवर्धन व पुनर्जीवनाचे काम करण्यात आल्यामुळे पालघर जिल्ह्यातील एक सुंदर जुना पूल अजूनच सुंदर करण्यात आलेला असून दहर्जे पूल आता विक्रमगड तालुक्यातील एक पर्यटन स्थळ झालेला आहे. लोक तिथे सेल्फी काढण्यासाठी येतात. तसेच या पुलाचे आयुर्मान निश्चितच वाढलेले असून त्यामुळे दहर्जे येथे नवीन पूल बांधण्याकरिताची शासनाची करोडो रुपयांची बचत झालेली आहे.
-श्रीमती ज्योती शिंदे
कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -