घरपालघरयुरीया खताच्या काळाबाजाराचा प्रश्न अधिवेशनात

युरीया खताच्या काळाबाजाराचा प्रश्न अधिवेशनात

Subscribe

नीमकोटेड अनुदानीत युरीया खताच्या होणार्‍या काळाबाजारा संबंधातील तारांकीत प्रश्न आमदार मनीषा चौधरी,आशीष शेलार,अतुल भातखळकर आणि श्रीनिवास वनगा यांनी थेट विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला.

बोईसर : पालघर जिल्ह्यातील अनुदानीत युरीया खताच्या काळाबाजाराचा प्रश्न थेट विधानसभा अधिवेशनात उपस्थित करण्यात आला आहे.युरीयाच्या या काळाबाजारात सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. पालघर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कृषी सेवा केंद्रातून पुरवठा करण्यात येणार्‍या नीमकोटेड अनुदानीत युरीया खताच्या होणार्‍या काळाबाजारा संबंधातील तारांकीत प्रश्न आमदार मनीषा चौधरी,आशीष शेलार,अतुल भातखळकर आणि श्रीनिवास वनगा यांनी थेट विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला.

जिल्ह्यातीलविक्रमगड,डहाणू,वाणगाव,चिंचणी,सफाळे,बोईसर,धुंदलवाडी,तलासरी,कासा,केळवे,कुडूस,खानिवली,कंचाड,पाचमा,मलवाडा,तलवाडा,मोखाडा,खोडाळा,जामसर,सायवन,आशागड आणि वाडा येथील कृषी सेवा केंद्राच्या नावे खरेदी केलेला हजारो टन अनुदानीत नीमकोटेड युरीया प्रत्यक्षात शेतकर्‍यांना वाटप न होता गोदामांमध्ये त्याची पॅकिंग बदलून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील काही टेक्स्टईल्स,केमिकल,फार्मा उद्योगांना बेकायदेशीरपणे पुरवठा केला जात असल्याचा तारांकीत प्रश्न विधानसभा सदस्यांनी उपस्थित केला होता.

- Advertisement -

तारांकीत प्रश्नाला उत्तर देताना या प्रकरणी जानेवारी महिन्यात भिवंडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत १०० टन युरीयाचा साठा जप्त करण्यात आला होता.भिवंडी तालुक्यातील पूर्णा गाव येथे निम कोटेड युरीयाची साठवणूक केल्याप्रकरणी नारपोली पोलीस ठाणे येथे १७ जानेवारी २०२३ रोजी भा.दं.वि.कलम ४२०,३४ व खत नियंत्रण आदेश १९८५ मधील खंड २५ (१) (२) (३) व अत्यावश्यक वस्तू सेवा अधिनियम १९५५ मधील कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या निमकोटेड युरीयाचा माल कोणत्या कृषी सेवा केंद्रातून आणला व मालाचा पुरवठा कोठे केला जाणार होता याचा तपास सुरू असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -