घरपालघरआला पाऊस अवकाळी सुणासुदीच्या वेळी

आला पाऊस अवकाळी सुणासुदीच्या वेळी

Subscribe

भाताची उडवी प्लास्टिक, ताडपत्रीच्या सहाय्याने पाण्याने भिजू नयेत यासाठी लपवून ठेवण्यासाठी एकच तारांबळ उडाली होती. याबाबत मोखाड्याचे तहसीलदार मयूर खेंगले यांना विचारले असता याबाबत प्रांतांना विचारून सांगतो, असे त्यांनी बोलताना सांगितले.

मोखाडा: राज्यभरात चालू असलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा गुरुवारी मोखाडा पंचक्रोशीतील शेतकर्‍यांना अनुभवायला मिळाला. दुष्काळात तेरावा महिना अशी काहीशी प्रतिक्रिया यावेळेस शेतकर्‍यांच्या मुखातुन बाहेर पडत होती.लागवडीच्या काळात पावसाळाभर वरुण राजाचा लपंडाव तर कधी धुवांधार कोसळणारा पाऊस यामुळे बळीराजा मेटाकुटीला आलेला असताना त्यात भर की काय म्हणून आता आलेल्या अवकाळी पावसामुळे भात, वरई व तूर पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.पहिलेच अस्मानी संकटाला दोन हात करत शेतकर्‍यांनी आपल्या पिकांची लागवड कशीबशी पूर्ण केली. त्यानंतर शेतीत तयार झालेले पिक कापणीसाठी मजुरांचा तुटवडा, मजुरांची वाढीव मजुरी आदी कारणांमुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यात भात आणि वरईचे भारे खळ्यावर आणण्याची लगबग संपायला आलेली असताना ऐनवेळी आलेल्या पावसाने शेतकर्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कारण अचानक आलेल्या पावसामुळे शेतात कापणी केलेले पिकांचे भारे खळ्यावर घेऊन यायचे की खळ्यावर रचून ठेवलेल्या भाताची उडवी प्लास्टिक, ताडपत्रीच्या सहाय्याने पाण्याने भिजू नयेत यासाठी लपवून ठेवण्यासाठी एकच तारांबळ उडाली होती. याबाबत मोखाड्याचे तहसीलदार मयूर खेंगले यांना विचारले असता याबाबत प्रांतांना विचारून सांगतो, असे त्यांनी बोलताना सांगितले.

भात, वरई, नागली कापून खळ्यावर ठेवले होते आणि अचानक आलेल्या पावसाने सर्व पिके भिजून नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍याने जगायचे कसे असा प्रश्न आम्हा शेतकर्‍यांना पडला आहे. प्रशासनाने पंचनामे करून शेतकर्‍यांना मोबदला द्यावा.

- Advertisement -

-गणेश भोगाडे
शेतकरी, टाकपाडा
&………………………………………………………

पावसाने धमाका केला

- Advertisement -

दिवाळी सणाला सुरूवात झाली असून मोखाड्यात फाटाक्यांची दुकाने आणि भाजी विक्रेते यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू झाली आहे. परंतु, अवकाळी पावसामुळे हा बाजार ताडपत्रीने झाकण्यासाठी धावपळ विक्रेत्यांना करावी लागली.
&………………………….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -