Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर पालघर बोईसर नवापूर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अखेर सुरू

बोईसर नवापूर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अखेर सुरू

Subscribe

आता खड्डेमय भागाच्या दुरूस्तीनंतर नवापूर नाका ते टाकी नाका या १.८ किमी लांबीच्या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.याच सोबत औद्योगिक वसाहतीमधील डीसी कंपनी ते कोलवडे-कुंभवली या गावांकडे जाणार्‍या खराब रस्त्याची देखील दुरूस्ती आणि डांबरीकरण होणार आहे.

सचिन पाटील,बोईसर: तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणार्‍या बोईसर नवापूर रस्त्याची दुरुस्ती अखेर सुरू झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून खड्डे आणि प्रचंड धुळीचा सामना करावा लागणार्‍या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणार्‍या बोईसर ते नवापूर या १.८ किमी लांबीच्या खड्डेमय रस्त्याच्या दुरूस्तीला सुरूवात करण्यात आली आहे.एमआयडीसीचे उपअभियंता मुकेश लांजेवार यांनी अग्रक्रमाने या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून दुरूस्ती आणि डांबरीकरण यासाठी ६.१७ कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे.बोईसर-नवापूर या रस्त्यावरील टाकी नाका ते मधुर नाकापर्यंतच्या दीड किमी भागाची नियमीत देखभाल दुरूस्तीअभावी खड्डे पडून अक्षरक्ष: धूळधाण उडाली होती.आता खड्डेमय भागाच्या दुरूस्तीनंतर नवापूर नाका ते टाकी नाका या १.८ किमी लांबीच्या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.याच सोबत औद्योगिक वसाहतीमधील डीसी कंपनी ते कोलवडे-कुंभवली या गावांकडे जाणार्‍या खराब रस्त्याची देखील दुरूस्ती आणि डांबरीकरण होणार आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांसोबतच ८ वर्षांपूर्वी बनवलेला बोईसर-नवापूर रस्ता हा देखील प्रचंड खड्डेमय झाला होता.यामुळे मालवाहतूक करणारी अवजड वाहने,दुचाकी आणि छोट्या वाहनचालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत होती.बोईसर नवापूर या मुख्य रस्त्यावरील मधुर हॉटेल चौक,धोडीपूजा आणि अवधनगर या ठिकाणी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती.सतत अवजड वाहनांची वाहतूक सुरू असलेल्या या रस्त्यांवर दुचाकी आणि लहान वाहनचालकांना अक्षरक्ष: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.अशा परिस्थितीत रस्त्यांची देखभाल दुरूस्ती करणार्‍या तारापूर एमआयडीसीने खड्डे भरण्यासाठी टाकलेली दगडी ग्रीड पावडर कुचकामी ठरत होती.या रस्त्यावरील खड्डे पडलेल्या भागाची व्यवस्थित दुरूस्ती आणि संपूर्ण डांबरीकरण व्हावे यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष जगदीश धोडी आणि या भागाच्या जिल्हा परिषद सदस्या पूर्णिमा धोडी यांनी एमआयडीसी प्रशासनाकडे पाठपुरवा केला होता.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -