घरपालघरसीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या नियंत्रण कक्षाची जबाबदारी पुन्हा पालिकेकडे

सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या नियंत्रण कक्षाची जबाबदारी पुन्हा पालिकेकडे

Subscribe

आता या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाची जबाबदारी पुन्हा स्वतः कडेच घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी पूर्ण वेळ स्वतंत्र कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाणार आहे.

भाईंदर :- मीरा- भाईंदर महानगरपालिका हद्दीत शासनाकडून आणि महापालिकेच्या फंडातून किंवा इतर निधीतून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या नियंत्रण कक्षाची जबाबदारी पोलीस प्रशासनाकडे देण्यात आली होती. तसेच घरफोडी, वाहन चोरी, चैन स्नॅचिंग तसेच अपघात आणि इतर गुन्ह्यात आरोपींना शोधून कारवाई करण्यासाठी किंवा गुन्हा उकल करण्यासाठी पालिकेकडून सदरील सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि त्याचा ताबा पोलिसांकडे देण्यात आला होता. मात्र मीरारोडमधील नया नगर परिसरात घडलेल्या हिंसक घटनेनंतर ही जबाबदारी पुन्हा पोलिसांकडून पालिकेकडे घेण्यात आली आहे. आता या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाची जबाबदारी पुन्हा स्वतः कडेच घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी पूर्ण वेळ स्वतंत्र कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाणार आहे.

मीरा भाईंदर शहर हे पूर्णतः सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या नियंत्रणाखाली आण्णयाच्या सूचना गृहविभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एका सल्लागाराची नेमणूक करून गृहविभाग, पालिका आणि पोलीस अशा तिन्ही यंत्रणांनी एकत्र येऊन शहराचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार शहरात सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यासाठी एकूण १७४ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालास शासनाने मंजुरी दिली आहे. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडले आहे, हे काम सुरु होण्यास दीर्घ काळ लागण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या परीने सीसीटीव्ही कॅमेर्‍याची उभारणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार शहरात ४८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभारून भाईंदर पश्चिम येथील उड्डाण पुलाखाली नियंत्रण कक्ष उभारले आहे.

- Advertisement -

धार्मिक वाद उसळल्यानंतर प्रश्न समोर

अवघ्या काही महिन्यापूर्वीच या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचा कारभार तत्कालीन पालिका आयुक्तांनी पोलीस प्रशासनाच्या हाती सोपवण्यात आला होता. त्यामुळे त्यांना गुन्हाचा तपास करण्यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यास मोठी मदत झाली असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र मागील काही दिवसापासून पोलिसांकडे पुरेषे मनुष्य बळ नसल्यामुळे पोलिसांकडून हे कक्ष बंद ठेवण्यात आले होते. त्याच दरम्यान २१ जानेवारी शहरात धार्मिक वाद उसळण्यानंतर सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या उपयुक्ततेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे हे कक्ष पुन्हा पालिकेमार्फत चालवण्याचा निर्णय आयुक्त संजय काटकर यांनी घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -