घरपालघरराज्यात कोरोनाचा धोका कमी होतोय - डॉ. अविनाश सुपे

राज्यात कोरोनाचा धोका कमी होतोय – डॉ. अविनाश सुपे

Subscribe

राज्यात कोरोनाचा धोका आता कमी होऊ लागला आहे. तिसरी लाट जवळपास येऊन गेली आहे. असे असले तरी नागरिकांनी मात्र शासनाचे सर्व नियम पाळायला हवेत, अशी माहिती राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.

राज्यात कोरोनाचा धोका आता कमी होऊ लागला आहे. तिसरी लाट जवळपास येऊन गेली आहे. असे असले तरी नागरिकांनी मात्र शासनाचे सर्व नियम पाळायला हवेत, अशी माहिती राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. नालासोपारा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या आरोग्य दिक्षा या वेब मिनारमध्ये ओमायक्रॉन, तिसरी लाट आणि उपचारपद्धती या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. सुपे यांनी दिली. नालासोपारा मेडिकल असोसिएशनने नागरिकांना आरोग्य विषयक माहिती मिळावी. यासाठी सुरु केलेल्या युट्युब चॅनलवरील हा पहिला कार्यक्रम होता. डॉ. अविनाश सुपे., सेव्हन हील्स हॉस्पिटलच्या उप अधिष्ठाता डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. रविंद्र देशपांडे आणि वसई विरार महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी भक्ती चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

ओमायक्रॉन काय आहे. तो कसा घातक नाही. बूस्टर डोस का घेतला पाहिजे. लसीकरणाचे महत्व, आरोग्य सेवेचे बळकटीकरण अशा अनेक विषयावर डॉ. अविनाश सुपे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ओमायक्रॉनच्या निदानपद्धती, नवनवीन उपचारपद्धती याविषयी डॉ. स्मिता चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तर डॉ. रविंद देशपांडे यांनी ओमायक्रॉन आणि त्यावरील उपचारपद्धतीची माहिती दिली. डॉ. भक्ती चौधरी यांनी वसई विरार महापालिका क्षेत्रात उपलब्ध असलेली आरोग्यसेवेची माहिती दिली. सूत्रसंचलन डॉ. रेणुका पाटील आणि डॉ. सिबल दिब्रिटो यांनी केले. तर आभार डॉ. प्रेरणा मांजलकर यांनी मानले. असोशिएशनचे सचिव डॉ. सचिन पाटील, डॉ. सूरज गायकवाड, डॉ. संदिप चौधरी, डॉ. कौशिक प्रजापती यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

- Advertisement -

हेही वाचाUP Assembly Election 2022: ‘लड़की हूं’ची कॅम्पेन गर्ल भाजपात प्रवेश करण्याची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -