घरपालघरतोच गरबा,तोच दांडिया आणि तोच उत्साह

तोच गरबा,तोच दांडिया आणि तोच उत्साह

Subscribe

त्यामुळे शहरातील चित्रशाळेत दुर्गामातेच्या मुर्त्या तयार झाल्या असून त्यांना रंगरंगोटी करणे व सजावट करण्याची कामे सुरू झाली आहेत. हातात मुर्त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी कमी दिवस बाकी असल्याने मूर्तिकारांना दिवस रात्र बसून मुर्त्यांना रंग देणे हिरे सजावट अशी कामे करावी लागत आहे.

विरार: गणेशोत्सवानंतर शारदीय नवरात्रौत्सवाची लगबग सुरू झाली आहे. रंगांचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवरात्रीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने मूर्तिकार, सार्वजनिक मंडळ घट साहित्य विक्रेते यांची लगबग सुरू झाली आहे .कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदा नवरात्रौत्सव साजरा करण्यास सरकारने विनाशर्थ परवानगी दिली आहे. त्यामुळे धुमधडाक्यात नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी सर्वच सज्ज झाले आहेत.नवरात्रीच्या ९ दिवसांत नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते. यावर्षी नवरात्रौत्सव २७ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, ५ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे शहरातील चित्रशाळेत दुर्गामातेच्या मुर्त्या तयार झाल्या असून त्यांना रंगरंगोटी करणे व सजावट करण्याची कामे सुरू झाली आहेत. हातात मुर्त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी कमी दिवस बाकी असल्याने मूर्तिकारांना दिवस रात्र बसून मुर्त्यांना रंग देणे हिरे सजावट अशी कामे करावी लागत आहे. शहरामधील विविध देवींच्या मंदिरांमध्ये तयारीला सुरवात झाली आहे. स्वच्छता, रंगरंगोटी आदी कामे जोरात सुरू आहेत. पारंपरिक गरबा नृत्य आणि दांडिया यांची तरुणी व महिलांना प्रचंड आवड आहे. कितीही व्यस्त असल्या तरी संपूर्ण नवरात्री दांडिया कार्यक्रमांना त्या आवर्जून जातातच त्यामुळे दांडिया, गरबा प्रशिक्षण वर्गांची धूम देखील सुरु झाली आहे. सलग दोन वर्षापासून नवरात्रोत्सवावर शासकीय निर्बंध होते. मात्र यावर्षी निर्बंधच रद्द करण्यात आल्याने मंडळाना नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून मंडळांकडून जय्यत तयारी सुरू आहे.

बाजारपेठा सजल्या

- Advertisement -

तर दुसरीकडे बाजारपेठ ही सजली असून पूजेसाठी लागणारे साहित्य, देवीचा मुखवटा, बांगडी ओटी तसेच घटाच्या पूजेसाठी लागणारे रंगीबेरंगी मडकीही बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. त्यामुळे यंदाचा नवरात्रौत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -