तुनिषाने आत्महत्या केलेला सेट आगीत खाक

मात्र, आगीत पूर्ण सेट जळून खाक झाला आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वसईः तुनिषा शर्माच्या आत्महत्येमुळे चर्चेत असलेला आलीबाबा दास्तान ए काबुल या टीव्ही मालिकेचा सेट रविवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत भस्मसात झाला. याआगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.वसई पुर्वेकडील कामण गावात असलेल्या भजनलाल स्टुडिओमधील दास्तान ए काबुल या हिंदी टिव्ही मालिकेच्या सेटला आग लागली होती. वसई -विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी रविवारी पहाटे आग आटोक्यात आणली. मात्र, आगीत पूर्ण सेट जळून खाक झाला आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पाच महिन्यांपूर्वी याच सेटवर अभिनेत्री तनिषा शर्मा हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या आईच्या तक्रारीवरून वालीव पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा प्रियकर शिझान खानला अटक केली होती. जामिनावर असलेला शिझान सध्या परदेशात सुरु असलेल्या खतरों के खिलाडी या कार्यक्रमासाठ रवाना झाला आहे. गेल्या आठवड्यात वसई कोर्टाने त्याला परदेशात जाण्यासाठी परवानगी दिली होती.