घरपालघरप्रशासकीय इमारतीचा स्लॅब कोसळला

प्रशासकीय इमारतीचा स्लॅब कोसळला

Subscribe

यासाठी दोन वर्षांपासून एसटी आगारातील सर्व व्यवहार दुसर्‍या इमारतीत सुरू आहेत. मात्र ही इमारत 1984 साली बांधली असून जीर्ण झाली.

सफाळे: पालघर तालुक्यातील सफाळे एसटी आगारातील प्रशासकीय इमारतीचा स्लॅब बुधवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोसळण्याची घटना घडली आहे. या कार्यालयात आगार व्यवस्थापक व कर्मचार्‍यांची येजा सुरू असते. मात्र त्या दरम्यान कार्यालयात कोणीही नसल्याने पुढील अनर्थ टळला असून कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सफाळे एसटी आगारातील मुख्य इमारतीचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. बांधकामांचे कॉलम उभे केले आहेत. मात्र कुठल्याही प्रकारे बांधकाम पूर्ण करण्याच्या हालचाली दिसत नाही. यासाठी दोन वर्षांपासून एसटी आगारातील सर्व व्यवहार दुसर्‍या इमारतीत सुरू आहेत. मात्र ही इमारत 1984 साली बांधली असून जीर्ण झाली.

या इमारतीला चारी बाजूंनी तडा गेल्या असून शेवटची घटका मोजत आहे. त्याचप्रमाणे एसटीच्या प्रयोगशाळेतील भिंती व वरचा स्लॅब कोसळला असून नादुरुस्त झाले आहेत. अशाच प्रकारे बुधवारी संध्याकाळी आगार व्यवस्थापक असलेल्या कार्यालयातील स्लॅब कोसळला. मात्र कार्यालयामध्ये कोणी नसल्याने कोणालाही दुखापत झाली नाही.
सफाळे आगार पालघर एसटी आगाराच्या अंतर्गत येत असून आगार व्यवस्थापकाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आगारातील दोन वर्षांपासून जीर्ण झालेल्या मुख्य इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र हे काम संथगतीने सुरू असल्याने एसटी आगारातील कर्मचार्‍यांना कुठल्याही प्रकारे निवारा शेड व्यवस्था नाही . एसटी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत. त्याचप्रमाणे प्रवाशांनाही तुटलेल्या पत्र्याच्या शेडचा व झाडांच्या सावलीत आधार घ्यावा लागत असल्याने त्यांचेही हाल होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -