Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर पालघर जिल्ह्यातील लसीकरण मोहीम संथ गतीने; पालघरचा राज्यात १८ वा क्रमांक

जिल्ह्यातील लसीकरण मोहीम संथ गतीने; पालघरचा राज्यात १८ वा क्रमांक

पालघर जिल्ह्यात लसीच्या डोसची कमतरता असल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर आली होती. लसींचा पुरवठा कमी होत असल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे.

Related Story

- Advertisement -

पालघर जिल्ह्यात लसीच्या डोसची कमतरता असल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर आली होती. लसींचा पुरवठा कमी होत असल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. तर, प्राधान्याने दुसरा डोस देण्याचे आदेश प्रशासनाने आरोग्य विभागाला दिले आहे. पालघर जिल्ह्यात आत्तापर्यंत ४ लाख ७ हजार ८१८ नागरिकांचे लसीकरण झाले असले तरी लसीकरणात पालघर जिल्ह्याचा वेग मंदावला आहे. हे राज्यातील आकडेवारीवरून समोर येत आहे. पालघर जिल्हा लसीकरणात राज्यात १८ व्या क्रमांकावर आहे. वारंवार उपलब्ध न होणाऱ्या लसी तसेच अनेक तांत्रिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील लसीकरण सत्र आणि इंटरनेटचा अभावामुळे लसीकरणाचा वेग मंदावल्याचे सांगितले जाते.

संपूर्ण राज्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली. त्यावेळेस पालघर जिल्ह्याने लसीकरणात राज्यात अव्वल क्रमांक पटकावला होता. सुरुवातीस चार लसीकरण केंद्रातून प्रत्येकी शंभर अशा ४०० कोरोना योद्धाचे लसीकरण त्यावेळी करण्यात आले होते. त्यापैकी पालघर ग्रामीण रुग्णालयात ७०, उपजिल्हा रुग्णालय जव्हार ६१, उपजिल्हा रुग्णालय डहाणू ६४, वसई विरार महानगरपालिका अंतर्गत वरूण इंडस्ट्रीज केंद्रात ६२ अशा चार केंद्रावर त्यावेळेस ३१९ कोरोना योद्धाचे लसीकरण करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले होते. राज्यातील ३५ जिल्ह्यातून हा उच्चांक त्यावेळेस झाला होता. आता लसीकरण मोहिमेत पालघर जिल्हा पहिल्या क्रमांकावरून थेट १८ व्या क्रमांकावर पोहचल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

लसी ज्या प्रमाणात उपलब्ध होतील व ज्या सूचना मिळतील तसे आपण लसीकरण वाढवू. १८ ते ४४ वयोगट सुरू झाला की लसीकरणाचा वेग वाढेल.
– डॉ. मिलिंद चव्हाण, जिल्हा लसीकरण समन्वयक

पालघर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे चाळीस लाखाच्यावर आहे. जिल्ह्यात सध्या ९३ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहेत. सात तारखेपर्यंत हेल्थकेअर वर्करना २७ हजार ४४९ प्रथम डोस तर दुसरा डोस १८ हजार ६१७ जणांना देण्यात आला आहे. फ्रन्टलाइन वर्करमध्ये प्रथम डोस २९ हजार ५४३ तर दुसरा डोस १२ हजार २०४ व्यक्तींना दिला आहे. १८ ते ४४ या वयोगटात ते ३३ हजार ७२९ जणांना प्रथम तर द्वितीय डोस १ हजार ९१० जणांना देण्यात आला असून ४५ वर्षाच्या वरील नागरिकांमध्ये २ लाख ४२ हजार ७११ जणांना प्रथम डोस तर दुसरा डोस ४१ हजार ६५१ जणांना देण्यात आले आहेत जिल्ह्यात सात तारखेपर्यंत ४ लाख ७ हजार ८१८ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे एवढ्या धीम्या गतीने लसीकरण मोहीम प्रशासन जर राबवणार असेल, तर वीस लाख लसीकरणाचे उद्दिष्ट गाठणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

लसीचा साठा पालघर जिल्ह्यासाठी वाढवून देण्यात यावा, अशी अनेक राजकीय पुढाऱ्यांकडून सतत मागणी होत आहे. पालघर जिल्हा लगत असलेल्या ठाणे जिल्हा लसीकरणात राज्यात तिसऱ्या स्थानावर असून सात तारखेपर्यंत ठाणे जिल्ह्यात १८ लाख ६ हजार २५१ नागरिकांनी लसीचा लाभ घेतला लसीकरणात अव्वल क्रमांकावर असलेला पालघर जिल्हा अठराव्या क्रमांकापर्यंत घसरत असेल तर ते पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाचे अपयश आहे.

 

जिल्ह्यामध्ये ९३ लसीकरण केंद्र सुरू आहेत. ज्या नागरिकांना प्रथम डोस दिलीत त्यांना प्राधान्याने दुसरा डोस दिला जात आहे. बरचशे नागरिक दुसरा डोसवाले आहेत. त्यांना फोन करून बोलवण्यात येत आहे. काही लोक परराज्यात गेले आहेत. पहिल्या लसीनंतर दुसऱ्या लसीसाठी ८४ दिवसाचा वेळ लांबल्यामुळे लसीकरणात खंड पडत आहे.

हेही वाचा –

एपीएमसी बाजार आवारात लसीकरण केंद्र सुरू

- Advertisement -