घरपालघरविद्यार्थी आयुक्तांनी घेतली शिक्षकांची परीक्षा

विद्यार्थी आयुक्तांनी घेतली शिक्षकांची परीक्षा

Subscribe

यावेळी त्यांनी शिक्षकांच्या अध्ययनाचे निरीक्षण केले. त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी संवाद साधत अडचणीही समजून घेतल्या.

मीरा भाईंदर: आयुक्त दिलीप ढोले यांनी थेट वर्गात जाऊन बाकावर बसून शिक्षक मुलांना कशा पध्दतीने शिकवतात याची पाहणी करत त्यांनी शिक्षकांचीच परिक्षा घेतली. यावेळी त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून अडचणींही जाणून घेतल्या. वॉक मिथ कमिशनर या उपक्रमांर्गत आयुक्त दिलीप ढोले यांनी गुरुवारी सकाळी दहिसर चेक नाका ते मीरा गाव परिसराचा दौरा केला. वाटेत त्यांनी अचानक मिरा गाव येथील मराठी शाळा क्रमांक २० व उर्दू शाळा क्रमांक ३२ याठिकाणी भेट दिली. धक्कादायक बाब म्हणजे आयुक्त ढोले थेट वर्गात बाकावर विद्यार्थ्यांच्या सोबत बसले. यावेळी त्यांनी शिक्षकांच्या अध्ययनाचे निरीक्षण केले. त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी संवाद साधत अडचणीही समजून घेतल्या.

शाळेतील परिसरात नियमित स्वच्छता ठेवण्यासोबतच शाळेभोवती लावण्यात आलेल्या झाडांची निगा राखून आणखी नवीन प्रकारची फुलझाडे परिसरात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. डिजिटल वर्गात शिक्षक डिजीटल बोर्डचा कशाप्रकारे वापर करतात याचीही माहिती घेतली. वर्गातील बेंच नव्याने उपलब्ध करून द्यावेत. शाळेत रंगरंगोटी करून त्यावर शाळेच्या निगडित विषयांवर वॉल पेंटिंग करण्यात यावे. असे निर्देश त्यांनी दिले. अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (उद्यान) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, उपायुक्त (शिक्षण) कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबीत, महापालिका अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील साफसफाई, उद्याने, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण, रस्त्यावरील खड्डे, रस्त्यावर अनधिकृतरित्या बसणारे फेरीवाले या नागरिकांच्या सततच्या प्राप्त होणार्‍या तक्रारी लक्षात ठेवून आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी “वॉक विथ कमिशनर” या संकल्पनेतून पाहणी दौरा सुरु केला आहे. गुरुवारच्या दौर्‍यात आयुक्त ढोले यांनी दहिसर चेकनाका ते डेल्टा गार्डन, मिरा गाव याठिकाणी फुटपाथवरील टपर्‍या, अनधिकृत शेड, फेरीवाले, अनधिकृतरीत्या विजेच्या पोलवर लावण्यात आलेले बॅनर, रस्त्याच्या कडेला तसेच फूटपाथ व दुकानासमोर ठेवण्यात येणार्‍या कुंड्या यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागास दिले. त्यानंतर फुटपाथवर असलेल्या अनधिकृत टपर्‍यांवर, शेड व विजेच्या पोलवरील बॅनरवर अतिक्रमण विभागामार्फत तातडीने कारवाई करण्यात आली. फूटपाथ व रस्त्यांवर काही ठिकाणी गटारांची तुटलेली झाकणे ही नव्याने बसवण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंतांना देण्यात आले..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -