घरपालघरहायकोर्टाचे आदेश मिरा भाईंदर तहसिलदारांनी बसविले धाब्यावर!

हायकोर्टाचे आदेश मिरा भाईंदर तहसिलदारांनी बसविले धाब्यावर!

Subscribe

मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील इंद्रलोक फेस ७ च्या समोर खाडी किनारा परिसरात मौजे नवघर परिसरातील जागेवर बेकायदा भरणी करून मँग्रोव्ह झाडांची कत्तल केल्याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात महसूल व पालिकेने गुन्हा दाखल केला आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील इंद्रलोक फेस ७ च्या समोर खाडी किनारा परिसरात मौजे नवघर परिसरातील सर्व्हे नं. ३६ (२४५), ३७ (२४६), ३९ (२४७) या जागेवर बेकायदा भरणी करून मँग्रोव्ह झाडांची कत्तल केल्याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात महसूल व पालिकेनी गुन्हा दाखल आहे. तसेच मुंबई हायकोर्ट यांच्या आदेशान्वये यापूर्वी कांदळवन व त्यापासून ५० मीटर अंतरावर केलेल्या माती भरणी, बांधकामे काढून ती जागा पूर्ववत करून त्याठिकाणी मँग्रोव्ह झाडांची लागवड करायचे आहे. असे त्या आदेशात म्हटले असतानाही मिरा भाईंदरचे अप्पर तहसिलदार नंदकिशोर देशमुख यांनी अवैधरित्या भरणी झालेल्या जागेवर मात्र १०० ब्रासची उत्खनन करण्याची परवानगी दिली. तसेच कांदळवन जागेत परिसरात जेसीबीच्या सहाय्याने झाडे मारण्याचे काम करून ती जागा सपाट करण्याचे चालू केले.

शहरात सीआरझेड, कांदळवन पाणथळ आणि इको सेन्सेटिव्ह झोन परिसरात जर गौण खनिज उत्खनन परवानगी अप्पर तहसिलदार देत असतील. तर अशा परवानग्यांची निश्चितच चौकशी केली जाईल. तसेच कांदळवन व सीआरझेड परिसरात परवानगी दिली जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
– अविनाश शिंदे, उपजिल्हाधिकारी ठाणे

- Advertisement -

मिरा भाईंदर अप्पर तहसिलदार कार्यालय हे अस्तित्वात आल्याने शहराला महसूल कामांसाठी दिलासा मिळेल वाटले असले, तरी अप्पर तहसिलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय हे मात्र शहराच्या मुळावर उठल्याचेच दिसून येत आहे. मिरा भाईंदर शहरात अप्पर तहसिलदार नंदकिशोर देशमुख यांचीच मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. शहरात अप्पर तहसिलदार हे माती भराव व उत्खननाच्या नावाखाली इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये डोंगर फोडण्याची परवानगी, कांदळवन, सीआरझेड आणि पाणथळ भागात मँग्रोव्ह झाडांवर भरणी करण्याची परवानगी तसेच महत्वाचे म्हणजे सीआरझेड भागात पर्यावरण विभागाची परवानगी नाही. तरीही विकासकांशी हातमिळवणी करून सीआरझेड भागात गौण खनिज उत्खनन (खोदकाम) परवानगी असा सध्या तरी प्रकार शहरात सुरू आहे.

मिरा भाईंदरमध्ये गौण खनिज परवानगी बाबतचा जो गैरप्रकार सुरू आहे. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. ना विकास क्षेत्र, सीआरझेड  क्षेत्र, पाणथळ, कांदळवन इको सेन्सेटिव्ह परिसरात कशा प्रकारे अपर-तहसिलदार (मिरा भाईंदर) व जिल्हाधिकारी गौण खनिज शाखा हे परवानग्या देत आहेत. याची उच्चस्तरीय चौकशी करून अपर तहसिलदार नंदकिशोर देशमुख यांना तात्काळ निलंबित करून दिलेल्या परवानग्या रद्द करून त्याची उलट तपासणी करण्यात यावी.
– सुनील भगत, समाजसेवक

- Advertisement -

नवघर येथील जागेवर २०१७-१८ साली मँग्रोव्ह झाडांची कत्तल करून हजारो ब्रास गौण खनिजाची बेकायदा भरणी केली. असे असताना त्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढवून त्यांच्यावर गुन्हा दाखल न-करता उलट विकासकांना त्यांची जमीन क्लिअर करून देण्याचा नावाखाली त्यांना फक्त नवल म्हणजे १०० ब्रास गौण खनिज उत्खननाची परवानगी देतात. त्यातूनच अप्पर तहसिलदार नंदकिशोर देशमुख यांचा काळाबाजार सुरू असल्याची चर्चा शहरात आहे.

महापालिकेत सध्या सीआरझेड, कांदळवन, पाणथळ व ना-विकास क्षेत्रात आणि त्यासोबतच इको सेन्सेटिव्ह झोन असलेल्या जागेत नवनवीन अनधिकृत बांधकामे पत्राशेड, बांबू शेड, जुन्या गाड्यांचे गोडाऊन व बेकायदा तबेल्यांचा उत आलेला असल्याचे पाहायला मिळत आहे. तर पालिका प्रभाग अधिकारी यांचा आशीर्वाद असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याकडे कारवाई करण्यास त्यांना स्वारस्य असल्याचे दिसून येत नाही. यातूनच अनधिकृत बांधकाम माफिया व विकासक यांनी झोपड्या बांधण्याचे काम चालू केलेले आहे. त्यात काही ठिकाणी झोपड्या या महिन्याच्या भाड्याने चालू असल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा –

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सडीज बेबी, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -