घरपालघरसोनसाखळी हिसकावून चोरटा फरार

सोनसाखळी हिसकावून चोरटा फरार

Subscribe

मात्र तोपर्यंत चोरटा २५ हजार किंमतीची सोन्याची चैन घेऊन पळून गेला होता.

भाईंदर :- भाईंदर पश्चिमेच्या १५० फूट रस्त्यावरून आपल्या घरी जाणार्‍या सपना छाजेड (जैन ) यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी ३० ते ३५ वर्षीय अज्ञात चोरट्याने हिसका मारून चोरून नेल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा भाईंदर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी साडेनऊच्या ६० फुटी रोडवरुन वालचंद बिल्डिंगकडे जाणार्‍या गल्ली मधून सपना या घरी जात असताना गल्लीत उभ्या असणार्‍या अज्ञात चोरट्याने तक्रारदार यांच्या समोरुन येवून गळ्यातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जोराने हिसकाऊन जबरीने चोरुन इंदीरा काम्प्लेक्सकडे जाणार्‍या गल्लीकडे धूम ठोकली. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत चोरटा २५ हजार किंमतीची सोन्याची चैन घेऊन पळून गेला होता. त्या चोराचे वर्णन अंदाजे ५ फुट उंचीचा, पुरुष, सडपातळ बांध्याचा, वय अंदाचे ३० ते ३५ वर्षे, अंगा चॉकलेटी रंगाचा टिशर्ट ,पाठीवर बॅग असलेला, केस बारीक असलेला असा आहे. सदरील प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास भाईंदर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवळे हे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -