Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर पालघर तस्करांनी बैलाला गाडीतून फेकले

तस्करांनी बैलाला गाडीतून फेकले

Subscribe

गो तस्करांनी गुरांना वाचविण्यासाठी आलेल्या गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला.याप्रकरणी डहाणू पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोईसर: पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गो तस्करांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या सुमारास शेतकर्‍यांच्या आणि रस्त्यावर फिरणार्‍या गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन कत्तलीसाठी तस्करी करणार्‍या घटनांमध्ये वाढ होत आहे. गो तस्करांच्या तावडीतून मुक्या जनावरांना वाचवण्यासाठी काही प्राणीप्रेमी गोरक्षक तरुण अक्ष्ररक्ष जीवावर उदार होऊन लढत आहेत. असाच एक डहाणू येथून रात्रीच्या अंधारात गुरे चोरण्याचा गो तस्करांचा डाव स्थानिक तरुणांनी उधळून लावला आहे.या घटनेत गाडीतून रस्त्यावर फेकलेल्या एका बैलाचा मृत्यू झाला असून एकूण 3 गो तस्कर अंधाराचा फायदा घेत जंगलात पळून गेले.गो तस्करांनी गुरांना वाचविण्यासाठी आलेल्या गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला.याप्रकरणी डहाणू पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

24 मे रोजी रात्रीच्या अंधारात डहाणूजवळील वाकी मुसळपाडा येथून बैल भरलेली अनोळखी पिकअप जीप कैनाड गावाकडे जात असल्याची माहिती मिळाल्यावर डहाणू परिसरातील विश्व हिंदू परिषद,बजरंग दल या संघटनेच्या गौरक्षकांनी डहाणू – कासा रस्त्यावरील कैनाड नाका व आशागड या ठिकाणी पाळत ठेवली होती.सकाळी 4 वाजेच्या सुमारास बैल भरलेली जीप चारोटी नाक्याकडे भरधाव वेगाने जात असल्याचे लक्षात आल्यावर तरुणांनी या जीपला थांबवण्याचा प्रयत्न केला. मणिपूर गावाजवळ जीपमधील गो तस्करांनी उलट गोरक्षकांवरच तलवार आणि दगडांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.तसेच जीपमधील एक बैल रस्त्यावर फेकून देऊन पाठलाग करणार्‍या गाड्यांना अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.यामध्ये रस्त्यावर फेकून दिलेल्या बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तीन चार गोरक्षक जखमी झाले आहेत. मणिपूर गावातील 100 ते 150 गावकरी जमा झाल्यावर गोतस्कर गाडी सोडून सकाळच्या अंधारात जंगलात पळून गेले.यानंतर गोरक्षकांनी कत्तलीसाठी जीपमध्ये अमानुषपणे बांधून ठेवलेल्या दोन बैलांची सुटका केली.
या गो तस्करीप्रकरणी भिवंडी येथील मुल्ला अबू वाहीद कमरुझामन आणि इतर दोन अनोळखी इसमांवर डहाणू पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -