Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरतो अज्ञात आरोपी सीसीटीव्हीने पकडला

तो अज्ञात आरोपी सीसीटीव्हीने पकडला

Subscribe

चौकशीत विरारच्या विराटनगर येथील शाम सरिता चाळीत राहणार्‍या भागोजी उत्तेकर (४७) याची उमेशने हत्या केल्याचे उजेडात आले. उमेशने हत्या का केली याचा तपास आता पोलीस करत आहेत.

वसईः नायगाव रेल्वे स्टेशनजवळील तिवरांच्या जंगलात हत्या करून फेकलेल्या मृतदेहाची ओळख पटवून मारेकर्‍याला गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली.२८ जानेवारीला नायगाव रेल्वे स्टेशनबाहेर असलेल्या तिवरांच्या झाडांच्या जंगलात एक मृतदेह सापडला होता. कोणताही पुरावा नसतानाही नायगाव पोलिसांची तीन पथके तसेच मीरा -भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा दोन तीनच्या पथकांनी संयुक्तरित्या याहत्येचा उलगडा करण्याचे काम हाती घेतले होते. पोलिसांनी नायगाव, वसई, नालासोपारा आणि विरार रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा माग घेतला आणि थेट आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला.पोलिसांनी मारेकरी उमेश शंकर निषाद (३०) याला विरारमधून अटक केली. चौकशीत विरारच्या विराटनगर येथील शाम सरिता चाळीत राहणार्‍या भागोजी उत्तेकर (४७) याची उमेशने हत्या केल्याचे उजेडात आले. उमेशने हत्या का केली याचा तपास आता पोलीस करत आहेत.

०००

- Advertisement -

नायगावच्या रेतीबंदरात मानवी हाडांचा सापळा

ही हत्येची घटना ताजी असतानाच नायगाव पूर्वेकडील रेती बंदरालगत असलेल्या तिवरांच्या जंगलात मानवी हाडांचा सापळा आढळून आला आहे. लघुशंकेसाठी गेलेल्या एका इसमाला एक मानवी कवटी दिसून आली. काही अंतरावरच हाडांचा सापळा दिसला. काहीतरी घडल्याची जाणिव झालेल्या त्या इसमाने नायगाव पोलिसांनी याची माहिती दिली. नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मानवी कवटी, हाडे ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवून दिली आहेत. न्यायवैद्यकीय अहवाल आल्यानंतर हा सापळा पुरुष की महिला याची माहिती मिळेल आणि मृत्यूचे कारणही स्पष्ट होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -