घरपालघरभाईंदरमध्ये अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू

भाईंदरमध्ये अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू

Subscribe

परंतु सुर्या धरणातून पाणी आणण्यासाठी पम्पिंग स्टेशनसाठी लागणारा वीजपुरवठा अद्यापपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे शहराला पाणी मिळण्यास विलंब होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

भाईंदर :- सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा ही योजना एमएमआरडीएकडून राबविण्यात येत असून या योजनेतील पहिल्या टप्प्यात वसई-विरार शहराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच १८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तसेच मीरा-भाईंदर महापालिकेला पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणातून २१८ दशलक्ष लीटर पाणी मिळणार आहे. शहराला हे पाणी मिळण्यासाठी सुर्या धरणापासून चेनागावपर्यंत पाईपलाईन लाईन टाकण्याचे काम पूर्ण होत आले आहे. मीरा- भाईंदर शहरात अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहे. परंतु सुर्या धरणातून पाणी आणण्यासाठी पम्पिंग स्टेशनसाठी लागणारा वीजपुरवठा अद्यापपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे शहराला पाणी मिळण्यास विलंब होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

वसई -विरार शहराला काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा सुरू केला आहे. तर मीरा- भाईंदर शहराला मे २०२४ पर्यंत पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यासाठी महापालिकेने शहरात अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. हा पाणीपुरवठा मीरा भाईंदरच्या चेना गावापर्यंत आणून देण्याची जबाबदारी एमएमआरडीएची आहे. त्यापुढे शहराला पाणी वितरण करण्याचे काम महापालिकेचे आहे. हे पाणी शहरात वितरण करण्यासाठी अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी राज्य शासनाने पालिकेला ५१६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. चेना येथे पाणी साठवण्यासाठी एमएमआरडीएकडून ५० दशलक्ष लिटर क्षमतेच्या टाक्या बांधण्यात येत आहेत. मीरा- भाईंदर शहरात देखील पाईपलाईन टाकण्याचे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. या योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रामधील तांत्रिक कामांसह सर्व ३२ फिल्टर बेडची कामे जवळपास पूर्ण झाली असून उर्वरीत किरकोळ कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -