घरपालघरसूर्या योजनेतील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीपथावर

सूर्या योजनेतील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीपथावर

Subscribe

हे काम पालिका आयुक्त संजय काटकर आणि शहर अभियंता दिपक खांबीत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर, उपअभियंता उत्तम रणदिवे, शाखा अभियंता अरविंद पाटील, भुपेश काकडे, दिपक जाधव हे करत आहेत.

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहराची लाईफलाईन आणि नागरिकांच्या अत्यंत उपयोगी असणारी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अमृत टप्पा क्रं.- २ मधून शहरात पिण्याचे पाण्याचा विषय असलेल्या कामाचे २० टक्के काम पूर्ण झाले असून बाकी काम प्रगती पथावर आहे. पालिकेकडून आतापर्यंत ३० किलोमीटर पाईपलाईन अंथरण्याचे काम झाले असून तसेच ८ पाण्याच्या टाकी बांधण्याचे कामही जाग्यावर प्रत्यक्षरित्या सुरू झाले आहे. बाकी १५ ठिकाणीही माती परिक्षणाचे काम पूर्ण झाले असून त्याठिकाणी सुद्धा लवकरच जलकुंभ बांधण्याचे काम होणार आहे.

मीरा- भाईंदर शहरासाठीचा मुख्यत्व मुद्दा असलेला पिण्याचा पाण्याच्या विषयाला सूर्या धरणातून पाणी पुढच्या वर्षी मीरा- भाईंदर शहराला सूर्या धरणातील ४१८ एमएलडी पाणी ५१६ कोटी रुपये अंतर्गत जलवाहिनी अंथरण्यासाठी मंजूर झाले आहेत. त्यानुसार कामाला सुरुवात झालेली असून त्यातच चेणे ते फाउंटन हॉटेलपासून पुढे शहरात काम सुरू आहे. तसेच आतापर्यंत ३० किलोमीटर अंतर्गत पाईपलाईन अंथरण्याचे काम झाले आहे. त्यात १७०० मिमीचे पाईप आहेत. तसेच पाण्याच्या टाकीपासून ३५० ते ५०० मिमी, १५० ते ६०० मिमीचे पाईप आहेत. ज्याठिकाणी नव्याने सिमेंट रस्ते बनविण्याचे काम सुरू आहे, त्याठिकाणी नवीन पाईपलाईन अंथरण्याचे काम प्राधान्याने करण्यात येत आहे. त्यासोबतच सीआरझेड बाधित जागेवर काम करण्यासाठी पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. तिकडील मान्यता आल्यानंतर त्याठिकाणी कामे केली जाणार आहेत. ईको सेन्सेटिव्ह झोनची मान्यता आली असून त्यानुसार काम सुरू आहे.हे काम पालिका आयुक्त संजय काटकर आणि शहर अभियंता दिपक खांबीत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर, उपअभियंता उत्तम रणदिवे, शाखा अभियंता अरविंद पाटील, भुपेश काकडे, दिपक जाधव हे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -